Why Doctors Handwriting is Bad:- डॉक्टरांचं खराब अक्षर आणि त्यामुळे रुग्णांना होणारा मनस्ताप याची चर्चा अनेकदा सोशल मीडियावर होत असते. एखाद्या रुग्णाला ज्यातलं अक्षरही कळत नाही ते अक्षर मेडिकलवाल्यांना कसं समजतं हा प्रश्न तर अनेकांना पडतो. पण काही वेळा तर मेडिकलवाले सुद्धा हे अक्षर ओळखण्यात फेल ठरतात. २०१८ मध्ये तर उत्तर प्रदेशातील न्यायालयाने डॉक्टरांच्या खराब अक्षरावर कारवाई केली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने खराब अक्षरासाठी तीन वेगवेगळ्या डॉक्टरांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला होता. पण डॉक्टरांचं अक्षर खराब असावं असा काही नियम नाही, किंबहुना सर्वच डॉक्टरांचे अक्षर सुरुवातीपासूनच वाईट असते असंही नाही. डॉक्टर बनण्याचं शिक्षण घेताना अशी नेमकी काय जादू होते हे आज आपण जाणून घेणार आहोत..

आपल्याला वाटत असेल की डॉक्टरांना फक्त प्रिस्क्रिप्शन लिहायचं काम असतं. पण हे खरं नाही. तुमचे डॉक्टर (बहुतांश वेळेस) तुमच्या वैद्यकीय इतिहासाचा पुरावा म्हणून तुम्ही त्यांना सांगितलेली प्रत्येक छोटी माहिती लिहून ठेवतात. आपल्यासारखेच महिन्यातून दोन वेळा डॉक्टरकडे जाणारे सर्व लोक एकत्र केले तर डॉक्टरला किती लिहावे लागत असेल याचा अंदाज तुम्हाला येईलच. खूप वेळ लिहिल्यावर हाताच्या स्नायूंवर ताण येतो. उदाहरणच द्यायचं तर, तुम्ही परीक्षेत पेपर लिहायला सुरुवात करता तेव्हा तुमचे अक्षर तुलनेने जास्त आखीव रेखीव असते पण शेवटच्या प्रश्नापर्यंत अक्षराची पार रयाच निघून जाते. याच सततच्या लिखाणामुळे डॉक्टरांचे अक्षर बिघडलेले असते.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
World Parkinson's Day 2024 Parkinson's disease Symptoms and causes
World Parkinson’s Day 2024 : कंपवाताच्या १० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणाने आजार; डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणतात…
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

प्रत्येकालाच कामाचा ताण असतो. पण विचार करा तुम्हाला दिवसातून कधी २० तर कधी अगदी ५० एक नवनवीन लोकांशी बोलायचं आहे. त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आहेत. प्रत्येकाला औषध सुचवायचे आहे. काही वेळा तर आजार काय आहे हे समजून घ्यायला सुद्धा मेहनत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत एखाद्या डॉक्टरच्या जीवात किती त्राण शिल्लक राहील हा प्रश्नच आहे. या ताण व थकव्यामुळेच अनेकदा डॉक्टरांचे अक्षर बिघडलेले असते.

हे ही वाचा<< विश्लेषण: पुरुषांना भांडी घासण्यासाठी आणलेल्या ‘Black Vim’ वरुन वाद का सुरु आहे?

बहुतांश डॉक्टर ज्यांच्याकडे रुग्णांची प्रचंड गर्दी असते, त्यांना प्रत्येक गोष्ट प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिताना मुद्देसूद लिहिण्याचा वेळ नसतो. अशा वेळी ते काही पॉइंटर्समध्ये औषध सुचवतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कठीण शब्द. डॉक्टरांनी अभ्यास केला असला तरी प्रत्येकजण अलीकडे कॉम्प्युटरवर अत्यंत अवलंबून जगू लागला आहे. अशावेळी हाताने लिहिताना स्पेलिंग चुकतात व त्या लपवण्यासाठी सुद्धा पटापट लिहिले जाते. चुकीच्या स्पेलिंग असूनही फार्मासिस्टला सुद्धा सरावाने संदर्भ लक्षात येतो.

हे ही वाचा<< विश्लेषण: तुमचा फोन किती वॉटरप्रूफ आहे? आयपी कोड वरून ओळखा, सोपा तक्ता पाहून जाणून घ्या

तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की २००६ च्या आकडेवारीनुसार, चुकीच्या प्रिस्क्रिप्शनमुळे वर्षाला ७००० मृत्यू होतात. डॉक्टरांचे खराब अक्षर या समस्येवर आता अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनीच उत्तर दिले आहे. बहुतांश डॉक्टर्स सध्या इलेक्ट्रिक म्हणजेच प्रिंट केलेली प्रिस्क्रिप्शन देत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा डॉक्टरांचे अक्षर व निदान आपण ज्या गोळ्यांचे सेवन करतोय त्याचे नाव लक्षात येईल.