-निशांत सरवणकर

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने अलीकडेच दोघा रेल्वे पोलिसांना अटक केली. याआधीही विविध केंद्रीय व राज्य यंत्रणांनी मुंबईतून अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. अमली पदार्थाच्या प्रत्येक कारवाईत मुंबईचा उल्लेख आवर्जून येतोच. अमली पदार्थाची सर्वाधिक विक्री मुंबईतच होते का? देशाची आर्थिक राजधानीच अमली पदार्थांची बाजारपेठ कशी ठरतेय?

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून

आतापर्यंतची मोठी कारवाई… 

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना १४७६ कोटींचे २०७ किलो अमली पदार्थ (१९८ किलो क्रिस्टल मेथाअॅम्पिटामाईन म्हणजेच एमडी आणि ९ किलो उच्च प्रतीचे कोकेन) एका फळांच्या ट्रकमध्ये वाशी येथे सापडले. ही देशातील सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आणखी एका कारवाईत जवाहरलाल नेहरू (न्हावा शेवा) बंदर येथून ५०२ कोटी रुपये किमतीचे कोकेन हस्तगत केले. तेही फळांच्या बॉक्समधून पाठविण्यात आले होते. पॅरिसहून मुंबईत आलेले १५ कोटींचे मेथाअॅम्पीटामाईनही मुंबई विमानतळावरून महसूल संचालनालयाने ताब्यात घेतले. नौदल विभागाच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाकडून १२० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त झाले. केंद्रीय यंत्रणांनी ऑक्टोबर महिन्यात केलेली ही कारवाई. गेल्या अनेक महिन्यांतील कारवाईवर नजर गेली तर मुंबई हेच केंद्र बिंदू असल्याचे दिसून येते.

अमली पदार्थ येतात कोठून? 

अमली पदार्थांविरोधातील कारवाईत सक्रिय असलेल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने म्यानमार, थायलंड आणि लाओस हे देश ‘गोल्डन ट्रायँगल’ तर इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांना ‘गोल्डन क्रेसेन्ट’ संबोधले आहे. या देशांमध्ये अफूची शेती मोठ्या प्रमाणात होते. या चक्रव्यूहात भारताची हद्द अडकल्याने अमली पदार्थांच्या तस्करीला मोकळे रान मिळाले आहे. पश्चिम भारतात अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात हेरॉईनची तस्करी होते तर म्यानमारमधून पूर्व भारतात हेरॉईनचा पुरवठा होतो. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीरमार्गे तस्करी होते. प्रामुख्याने सीमेवरून किंवा हवाईमार्गे हा पुरवठा होत होता. आता जलमार्गाचा वापर केला जातो. गुजरातमधील मुंद्रा बंदरात सापडलेला तीन हजार किलोचा अमली पदार्थांचा साठा हा त्याचाच भाग होता. नेपाळ, बांगलादेश, भुतान, म्यानमार या देशांतून भारतात होणाऱ्या तस्करीमुळे मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगला, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमार्फत दिल्ली व मुंबईत पुरवठा होतो. 

देशातील सद्यःस्थिती…

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अफूची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अफू म्हणजे खसखसची शेती. अफुच्या बोंडाला चिरा मारून त्यातून दूध काढले जाते. त्यावर प्रक्रिया करून त्याच्या चकत्या पाडतात त्याला अफिम म्हणतात. शासनाकडून अधिकृत परवानगी  घेऊन अशी शेती केली तरी तो माल शासनाला द्यावा लागतो. यावर अमली पदार्थ प्रतिबंधक अधिकाऱ्याचे लक्ष असते. परंतु दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक मालाचे उत्पादन करून ते विकले जाते. अफिमवर रासायनिक प्रक्रिया करून पांढरे म्हणजे चांगल्या प्रतीचे हेरॉईन व त्यापासून पुढे ब्राऊन शुगर बनविली जाते. चरस हे प्रामुख्याने नेपाळमधून येते तर पाकिस्तानही चरसचा पुरवठादार आहे. कोकेन मात्र आफ्रिकन देशांतून येते. दिल्लीत, मुंबईजवळ नालासोपारा, उत्तर प्रदेश आदी ठिकाणी ही मंडळी झुंडीने राहतात.

मुंबई पोलिसांची कारवाई …

जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या काळात आठ हजार १८४ गुन्हे दाखल. या कारवाईत विविध प्रकारचे अडीच  हजार किलो (आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमत २५०२ कोटी) अमली पदार्थ जप्त. यामध्ये सर्वाधिक एमडी या अमली पदार्थासह हेरॅाईन, चरस, गांजा, कोकेन आदींचा समावेश आहे. बदलत्या काळानुसार पारंपरिक गांजाऐवजी आता विदेशी गांजाची (फक्त पाणी व कार्बनवायुच्या वापरातून (हायड्रोपोनिक) तयार झालेल्या) मागणी भरपूर वाढली आहे. सध्या ‘विड’ या नावाने हा अमली पदार्थ ओळखला जातो. पब्स, रेव्ह पार्ट्यांमध्ये त्याला सध्या खूप मागणी आहे. कॉल सेंटर्स, आयटी कंपन्याच्या आसपास या अमली पदार्थांची विक्री जोरदार होते. 

प्रामुख्याने आढळणारे अमली पदार्थ… 

एमडीएमए – (मिथिलिनडायॲाक्सीमेथाअॅम्फिटामाईन) मुंबईजवळच्या परिसरातील रासायनिक कारखान्यातून सहज उपलब्ध. महाविद्यालये, झोपडपट्टी परिसरात सर्रास आढळणारा. 

हेरॅाईन – मूळ स्रोत अफगाणिस्तान. इराणमार्गे भारतात. न्हावा शेवा बंदरमार्गे मुंबईत. धारावी, कुर्ला, मुंबई सेंट्रल तसेच पश्चिम उपनगरात उपलब्ध. 

गांजा – आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिसा येथे उपलब्ध. उत्तनमार्गे मुंबईत. धुळे, जळगाव, शिरपूर, उत्तन परिसरात अवैध शेती. 

चरस – हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, नेपाळमधून येणारा हा अमली पदार्थ कुर्ला, वर्सोवा. माटुंगा, अंधेरी, डोंगरी, भायखळा, ठाणे येथे सहज उपलब्ध. कोकेन – इतर अमली पदार्थांच्या तुलनेत महाग असल्यामुळे उच्चभ्रुंच्या रेव्ह पार्टीत उपलब्ध. नायजेरियन तस्कर आघाडीवर. मीरा रोड, नालासोपारा, खारघर, उलवे, चकाला, अंधेरी, वांद्रे, पायधुनी, डोंगरी, मानखुर्द परिसरांत दलालांचे अड्डे.

आर्थिक उलाढाल…

१९८६ च्या सुमारास दाऊदने दुबईत बस्तान मांडल्यानंतर अमली पदार्थांच्या तस्करीवरच लक्ष केंद्रित केले होते. इक्बाल मिरचीच्या सहाय्याने त्याने यामध्ये करोडो रुपये कमावले. या जोरावर त्याने मुंबईत बेनामी मालमत्ता खरेदी केल्या. कोकेनची एक ग्रॅमची किंमत चार ते पाच हजार रुपयांच्या घरात आहे. (कोकेनचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर किलोमागे ७० लाख आहे) हेरॉईनचा दर यापेक्षा कमी दोन हजार तर एमडीसाठी ८०० ते ९०० रुपये दर आहे. त्यामुळे एमडीला मागणी आहे. मात्र सध्या विदेशी गांजा स्वस्त असल्याने त्याचा पुरवठा अधिक होतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमली पदार्थांची किंमत ही प्रत्येक देशागणिक कमी-अधिक होते. कुवेतमध्ये कोकेनला सर्वाधिक दर आहे तर सर्वांत कमी दर उरुग्वेत आहे.

विक्रीला प्रतिबंध शक्य? 

अमली पदार्थविरोधी कारवाया करण्याचे आदेश दिले गेले की, पोलीस जोरदार कारवाई करतात. रॅानी मेंडोंसा ते डॉ. सत्यपाल सिंग, राकेश मारीया आदींनी असे आदेश दिले आणि मुंबईतील ९३ पोलीस ठाण्यांतून कारवाई होऊ लागली. अमली पदार्थ तस्करीतील म्होरके मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची माहिती स्थानिक पोलिसांना असते. मनात आणले तर ते निश्चितच प्रतिबंध घालू शकतात. पण त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे.