एचआयव्ही एड्सचे निदान झाल्यानंतर आता मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मागच्या ३० वर्षात औषधांच्या क्षमतेमध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे उपचारात सुधारणा झाली आहे. जगभरात अनेक ठिकाणी एड्सवरील औषधे मोफत मिळतात. एड्सवर उपचार केलेले रुग्ण एक सामान्य, सुखी आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतात. जे रुग्ण औषधे घेत आहेत ते कोणत्याही भीती शिवाय आपल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवू शकतात. एचआयव्ही या विषाणूवर गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या डॉक्टरांनी DW (Deutsche Welle) या संकेतस्थळाला सांगितले की, जॉन्सन आणि जॉन्सनच्या लसीच्या चाचणीत अलीकडे अपयश आले, ही बातमी निराशाजनक असली तरी हा काही जगाचा शेवट नाही. क्लेअर रोथ यांनी आपले अनुभव इंडियन एक्सप्रेसच्या संकेतस्थळावर कथन केले आहेत. त्यासंबंधी घेतलेली ही माहिती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या फार्मास्युटिकल फर्मने जानेवारीमध्ये एचआयव्ही वरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या थांबविल्या. एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यात सदर लशी निष्प्रभ ठरल्या होत्या. औषधांमध्ये संशोधन होत असले तरी एचआयव्हीची प्रकरणे हवी तितकी कमी होत नाहीत. उलट जगाच्या काही भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. युएनने मागच्या वर्षी जाहीर केलेल्या एका अहवालात सांगितले होते की, १.५ दशलक्षाहून अधिक लोकांना २०२१ मध्ये एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. जागतिक स्तरावर रुग्णवाढीचा जो अंदाज होता, त्यापेक्षा तिपटीने ही संख्या अधिक आहे. आतापर्यंत व्हायरसने संक्रमित झालेल्या ३८ दशलक्ष रुग्णांपैकी सुमारे ७३ टक्के लोक उपचार घेत होते. तर १५ टक्के लोकांना हे माहितच नव्हते की, त्यांना संसर्ग झालेला आहे, असे या अहवालात म्हटले आहे. २०२१ मध्ये जगभरात एचआयव्ही आणि एड्स प्रतिबंध कार्यक्रमांना देण्यात येणाऱ्या निधीमध्ये कपात करण्यात आली म्हणून रुग्णसंख्या कमी होण्यात स्थिरता आल्याचे सांगितले जाते. पण हे पूर्णसत्य नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why hiv treatment is still undermined by stigma kvg
First published on: 08-02-2023 at 13:31 IST