नोव्हेंबर महिन्यापासूनच भारतात विवाहाचा हंगाम सुरू झाला आहे. भारतात विवाह एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरे केले जातात. भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये अनेक प्रथा-परंपरा पाहायला मिळतात. परदेशातील नागरिकांनाही भारतीय विवाहांचे आकर्षण असते. हा प्रेमाचा उत्सव आहे आणि तो भारतीयांपेक्षा चांगला कोणीही करत नाही. विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च करून कुटुंबातील प्रतिष्ठा आणि आर्थिक सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. ‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’नुसार, भारतात दरवर्षी सुमारे एक कोटी विवाह होतात, त्यामुळे विवाह उद्योग जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग ठरला आहे. भारतीय विवाह सोहळे अर्थव्यवस्थेला कसे चालना देतात? त्याविषयी जाणून घेऊ या.

१२ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या सध्याच्या विवाहाच्या हंगामात ४७ शुभ तारखा आहेत. पहिल्या टप्प्यात १६ डिसेंबरपर्यंत १८ शुभ दिवस असतील. विवाहसोहळ्यांची दुसरी फेरी १६ जानेवारीपासून सुरू होणार असून मार्चपर्यंत चालणार आहे. ट्रेडर्स बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ने भाकीत केले आहे की, विवाहाच्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ४८ लाख लग्न होतील, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे सहा लाख कोटी रुपयांचे योगदान असेल. एकट्या दिल्लीत ४.५ लाख विवाहसोहळे आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. या हंगामात अंदाजे १.५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल. ‘टाईम्स ऑफ इंडिया'(TOI) नुसार, कोलकाता आणि आसपासच्या भागात या लग्नाच्या हंगामात ६० हजार समारंभ आयोजित होण्याचा अंदाज आहे. उद्योगतज्ज्ञ आणि व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे की, शहरात ६५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो, जो गेल्या हंगामाच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढला आहे.

Gujarat wedding over food
Gujarat : लग्नात भासली जेवणाची कमतरता, मुलाच्या कुटुंबीयांनी थांबवला विवाह, वधूने पोलिसांना बोलावलं अन् पुढे घडलं असं की…
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Nirmala Sitharaman announces provision of Rs 1 28 lakh crore for education sector in Budget
इस मोड से जाते है… ; शिक्षणासाठी १.२८ लाख कोटी
Bullet train
महसूल आणि खर्च: देखाव्यापेक्षा सुधारणा हव्या आहेत…
Economic Survey Report predicts possible growth rate of 6 8 percent
६.८ टक्क्यांचा विकासवेग शक्य
Need for economic reforms Recommendation to create 8 million jobs annually
आर्थिक सुधारणांची गरज! सर्वंकष नियमन सुधारणा, वार्षिक ८० लाख रोजगार निर्मितीची शिफारस
Ananth Nageswaran
अग्रलेख: कसचे काय नि कसचे काय!
१२ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या सध्याच्या विवाहाच्या हंगामात ४७ शुभ तारखा आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : तुम्ही ‘Demisexual’ आहात का? या नवीन लैंगिक ओळखीची इतकी चर्चा का?

अर्थव्यवस्थेला चालना

भारतीय विवाह हंगामादरम्यान कपडे, दागिने, खानपान आणि प्रवास यासह अनेक क्षेत्रांना फायदा होण्याची अपेक्षा असते. लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यामुळे आणि प्रवास पुन्हा सुरू झाल्याने उद्योगांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. इकॉनॉमिक टाईम्स (ईटी) च्या वृत्तानुसार क्रीडा, कपडे आणि जीवनशैली उत्पादनांमधील विक्री वाढली आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या हंगामाचा पहिला टप्पा भारतातील सणासुदीच्या हंगामाशी जुळतो, ज्यामुळे व्यवसाय वाढीस चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

बिझनेसलाइनशी बोलताना फर्न्स एन पेटल्स संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विकास गुटगुटिया म्हणाले, “हा लग्नाचा हंगाम सर्वात प्रभावी मानला जात आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बुकिंगमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी प्रीमियम डेकोर, फुलांची व्यवस्था, फूड स्टाइलिंग आणि अनोखे फूड प्रेझेंटेशन यांची मागणी वाढण्याबरोबरच लोक लक्झरी विवाहसोहळ्यांकडेही वळताना दिसत आहेत.” मागणी वाढल्यामुळे मोठे आणि किरकोळ विक्रेते चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात सध्याच्या लग्नाच्या हंगामावर मोठा आर्थिक फायदा करून घेत आहेत. ‘इकॉनॉमिक टाईम्स’नुसार, वेदांत फॅशन्सने कमकुवत मागणीमुळे काही काळात आर्थिक घसरण पाहिली आहे. वेदांत फॅशन्सकडे पुरुषांचा एथनिक वेअर ब्रँड मान्यवरची मालकी आहे. पण, यावेळी त्यात बदल होण्याची अपेक्षा आहे. त्याचे मुख्य महसूल अधिकारी वेदांत मोदी यांनी सांगितले की, सप्टेंबरपासून व्यवसाय पुन्हा रुळावर आला आहे, कारण सण नोव्हेंबर-डिसेंबर लग्नाच्या मोसमात आले आहेत.

भारतीय विवाह हंगामादरम्यान कपडे, दागिने, खानपान आणि प्रवास यासह अनेक क्षेत्रांना फायदा होण्याची अपेक्षा असते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

ते म्हणाले की, लोक आधीच खरेदी करण्यापेक्षा लग्नाच्या तारखांच्या जवळ खरेदी करत आहेत. “भारताची वाटचाल कशी आहे हे पाहता लोकांना सर्व काही लवकर हवे असते, म्हणून आम्ही फक्त एक ट्रेंड पाहतो की लोक त्यांच्या लग्नाच्या दिवसांच्या जवळ खरेदी करण्यास सुरुवात करतील.” या लग्नसराईत प्रवासही वाढला आहे. “दिल्ली, मुंबई, श्रीनगर, जयपूर आणि गोवा यांसारख्या प्रमुख मेट्रो हब आणि विश्रांतीच्या ठिकाणांसाठी फ्लाइट बुकिंगमध्ये वार्षिक ७० ते ८० टक्क्यांनी लक्षणीय वाढ होत आहे,” असे इक्सीगोचे ग्रुप सीईओ अलोक बाजपेयी यांनी ‘बिझनेसलाइन’ला सांगितले. वाराणसी आणि अमृतसरसारख्या टियर-II शहरांमधील विवाहांमुळे फ्लाइट बुकिंग वाढले आहे, असेही ते म्हणाले.

दागिने, प्रवास आणि खानपान यांसारख्या विवेकी श्रेणींसाठी लग्नाचा हंगाम महत्त्वाचा आहे. ज्वेलरी ब्रँड तनिष्कने ‘इकॉनॉमिक टाईम्स’ला सांगितले की, केंद्राने सीमा शुल्क कमी केल्यानंतर लग्नाच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. जुलैमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात, केंद्राने सोन्याच्या बारांवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून सहा टक्के, सोन्याचे डोरे १४.३५ टक्क्यांवरून ५.३५ टक्के, चांदीच्या बारांवरील सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून सहा टक्के केला आहे, त्यामुळे दागिने स्वस्त झाले आहेत आणि दागिन्यांची मागणी वाढली आहे.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने निराश लोकांना इटलीत केवळ ८४ रुपयांत घर; काय आहे नेमका प्रकार?

‘इकॉनॉमिक टाईम्स’नुसार, टायटनच्या ज्वेलरी विभागाचे सीईओ अजॉय चावला यांनी विश्लेषकांना सांगितले की, “एकदा सोन्याच्या किमती सुधारल्या की, बरेच लोक खरेदीला सुरुवात करतील. सणासुदीच्या काळात लग्नाच्या दागिन्यांचीही मागणी वाढते,” असेही ते म्हणाले. “आम्हाला वाटते की, पुढील दोन तिमाहीत चांगला व्यवसाय होईल,” असे चावला म्हणाले. भारतीय विवाह उद्योग भविष्यातही विस्तारण्याची शक्यता आहे आणि अंदाजानुसार २०२५ पर्यंत हा तब्बल १० ट्रिलियन रुपयांपर्यंतचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

Story img Loader