सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सवर कारवाई करीत आहे. बाजार नियामकाने एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यात अशा इन्फ्लुएंसर्सना शेअर बाजारातील सल्ला देताना थेट स्टॉकच्या किमती वापरण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये असे वृत्त आले होते की, सेबीने खोट्या फायनान्शियल इन्फ्लुएंसर्सच्या सुमारे १५,००० वेबसाइट्स काढून टाकल्या. परंतु, हे प्रकरण काय? फिनफ्लुएन्सरमधील सेबीच्या रडारवर का आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

नेमके प्रकरण काय?

फिनफ्लुएन्सर सोशल मीडियावरील त्यांच्या प्रभावाचा फायदा घेत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा सल्ला देतात. त्यात असे अनेक फिनफ्लुएन्सर गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवतात. त्यामुळे अनेक जण गुंतवणूक करतात आणि त्यांची फसवणूक होते. हे फिनफ्लुएन्सर यूट्यूब, एक्स, इन्स्टाग्राम व टेलिग्रामवर गुंतवणुकीबाबत सल्ला देतात. तसेच शेअर बाजारासंबंधी अनेक अभ्यासक्रमदेखील चालवतात. शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या नावाखाली भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो आणि त्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जातात.

हेही वाचा : कुख्यात कैद्यांच्या तुरुंगात ट्रम्प बेकायदा स्थलांतरितांना पाठवणार; काय आहे ग्वांटानामो बे?

‘सीएनबीसी’नुसार, बाजार नियामकाने नोंदणी नसलेल्या सल्लागारांना त्यांच्या फॉलोअर्सना सूचना देताना तीन महिन्यांच्या जुन्या किमती वापरण्याचे आदेश दिले आहेत. याचा परिणाम गुंतवणूकदारांना शिक्षित करण्याच्या नावाखाली चुकीचा सल्ला देणाऱ्या फायनान्सर्सवर होईल. बाजार नियामकाने अनिवार्य केले आहे की, कोणत्याही नोंदणी नसलेल्या सल्लागाराला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तीन महिन्यांच्या जुन्या किमती वापराव्या लागतील. ‘सीएनबीसी’नुसार, सेबीने फायनान्सर्सना त्याच्या परवानगीशिवाय विशिष्ट स्टॉक्सवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सल्ला किंवा कोणतीही शिफारस देण्याचे आदेश दिले आहेत. मार्केट रेग्युलेटरने फायनान्सर्सना स्टॉक्सवर परतावा मिळविण्याबद्दल किंवा त्यांच्या कामगिरीबद्दल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही दावे करण्यास प्रतिबंधित केले आहे.

बाजार नियामकाने एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यात अशा व्यक्तींना शेअर बाजारातील सल्ला देताना थेट स्टॉकच्या किमती वापरण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘सीएनबीसी’च्या म्हणण्यानुसार, सेबीने नोंदणीकृत संस्थांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ‘असोसिएशन’साठी फायनान्सर्सना पैसे देण्यासही प्रतिबंध केला आहे. सेबीने परिपत्रकात नमूद केले आहे, “त्यांच्याशी किंवा त्यांच्या एजंटशी संबंधित कोणतीही व्यक्ती, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वरीलपैकी कोणत्याही गोष्टींमध्ये सहभागी होणार नाही, याची खात्री करणे सेबीद्वारे नियंत्रित केलेल्या व्यक्तींची जबाबदारी आहे.” ‘मिंट’नुसार, हे निर्बंध मार्केटिंग एजन्सीद्वारे जाहिराती, ब्रँडिंग व प्रचारावर देखील लागू आहेत.

हे नियम २९ ऑगस्ट २०२४ रोजी अमलात आले. “बोर्डाने नियमन केलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या एजंटना २२ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे की, वरीलपैकी कोणत्याही कामात गुंतलेल्या व्यक्तींबरोबर त्यांचे विद्यमान करार असतील, तर ते रद्द करावे.” सेबीने इशारा दिला आहे की, कोणत्याही नोंदणीकृत संस्थेने त्यांच्या परिपत्रकाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांना दंड होऊ शकतो किंवा त्यांचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो.

हेही वाचा : अमेरिकन कंपन्यांची झोप उडवणारे ‘डीपसीक एआय’ वापरणे सुरक्षित आहे? जाणून घ्या चीनच्या चॅटबॉटविषयी महत्त्वपूर्ण गोष्टी

सेबीने हे पाऊल का उचलले? याचा काय परिणाम होऊ शकतो?

‘मिंट’च्या मते, भारतीय अधिकारी या चुकीची माहिती पोहोचवणाऱ्या फायनान्सर्सची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेत आहेत. अनेक इन्फ्लुएन्सर्स अफवा पसरवत असून, लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवण्याचे काम करीत आहे. त्यामुळे नक्की खरा सल्ला कोण देतेय, हेदेखील ओळखणे लोकांसाठी अवघड होते. यापैकी बऱ्याच फिनफ्लुएन्सरचे ‘एक्स’ आणि ‘इन्स्टाग्राम’सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. ‘बिझनेस टुडे’नुसार काही फायनान्सर्सचे लाखो यूट्यूब फॉलोअर्स आहेत.

त्यांचे Zerodha, Groww, Upstox व 5Paisa पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यातील अनेक फायनान्सर्स अफाट पैसा कमावत आहेत. ब्रोकिंग फर्मच्या एक्झिक्युटिव्हने ‘आउटलेट’ला सांगितले, “एकदा तुम्हाला एक दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स मिळाले आणि ब्रोकिंग फर्म्समध्ये सहभागी होताना तुम्ही साप्ताहिक आधारावर व्हिडीओ तयार करीत असाल, तर तुमची मासिक कमाई १५ ते ३० लाखांपर्यंत असू शकते.” सेबीचे नियमन केलेले फंड मॅनेजर आणि ॲसेट मॅनेजमेंट फर्मसुद्धा नवीन ग्राहक आणण्यासाठी या फायनान्सर्सकडे वळत आहेत.

हेही वाचा : मॉडेलिंग ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीपर्यंतचा प्रवास, कोण आहेत रुबी ढल्ला?

“टॉप फायनान्सर्स कंपनीच्या चॅनेलवर दिसण्यासाठी प्रति व्हिडीओ पाच ते १० लाख रुपये शुल्क आकारू शकतात. काही वेळा या कंपन्या ठरावीक व्हिडीओंसाठी वार्षिक करारदेखील करतात आणि त्याचे शुल्क एक कोटीपर्यंत जाऊ शकते,” असे कार्यकारी पुढे म्हणाले. परंतु, यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी ऑगस्टमध्ये ‘मिंट’ला सांगितले की, फायनान्सर्स गुंतवणूकदारांची दिशाभूल करीत आहेत आणि पैसे कमावत आहेत. आमच्याकडे गुंतवणूकदारांकडून अनेक तक्रारी येत आहेत. गेल्या तीन महिन्यांत १५,००० हून अधिक सामग्री साइट काढून टाकण्यात आल्या आहेत. मनीकंट्रोलच्या मते, अनेक फायनान्सर्ससाठी हा निर्णय धक्कादायक आहे. या निर्णयामुळे शेअर बाजाराच्या शिक्षणाच्या आडून नोंदणी न केलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक धक्का आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is sebi cracking down on finfluencers rac