प्रबोध देशपांडे

क्षयरोग (टीबी) हा ‘ट्यूबरक्युलोसिस’ या जिवाणूमुळे होणारा आजार जगभरातील मृत्यूच्या १० प्रमुख कारणांपैकी एक आहे. २४ मार्च १८८२ रोजी डॉ. रॉबर्ट कॉख यांनी क्षयरोगाचे कारण शोधून काढले. यामुळे क्षयरोगाचे निदान आणि उपचार करण्याचा मार्ग मोकळा झाला. क्षयरोगाविषयी जनजागृतीचा अभाव, अज्ञान, चुकीची माहिती, लक्षणांकडे दुर्लक्ष आणि औषधांचा प्रतिकार ही प्रमुख आव्हाने आहेत, अशी माहिती अकोला महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप चौधरी यांनी दिली.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला

क्षयरोगाची लागण होण्याचा धोका कुणाला?

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना क्षयरोगाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय पोषण आहाराचा अभाव, एचआयव्हीबाधित, वयोवृद्ध, मधुमेहग्रस्त, अल्कोहोलचे सेवन करणाऱ्यांना क्षयरोगाचा धोका अधिक असतो. दीर्घकाळ ‘स्टेरॉइड’ घेणाऱ्यांनाही क्षयरोगाची जोखीम असते.

क्षयरोगामुळे कुठले अवयव प्रभावित होतात?

क्षयरोगाचा केस आणि नखे वगळता सर्व अवयवांवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये फुप्फुसे, लिम्फनोड्स, मेंदू, हृदय, मूत्रपिंड, आतडे, गर्भाशय, हाडे, सांधे, त्वचा आदींचा समावेश आहे.

निदान करणे कठीण असते का?

क्षयरोगाची लक्षणे ही इतर अनेक आजारांसारखीच असतात, यामुळे कधी कधी निदान करणे कठीण जाते, परंतु सौम्य ताप, अंगदुखी, वजन कमी होणे आणि सहज थकवा येणे ही सामान्य लक्षणे आहेत. क्षयरोगामुळे सतत खोकला, ताप, थुंकीत रक्त येणे आणि वजन कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. क्षयरोग असलेल्या अनेकांना सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, हे विशेष.

उपचाराचा कालावधी किती?

क्षयरुग्णांनी उपचार पूर्ण केले पाहिजेत. साधारणत: सहा महिन्यांपर्यंत उपचार घेणे आवश्यक आहे. एचआयव्हीबाधित किंवा हाडांचा, सांध्याचा क्षयरोग असलेल्या लोकांमध्ये उपचार नऊ महिन्यांपासून ते १८ महिन्यांपर्यंत असू शकतो. रुग्णांनी चेहरा मास्कने झाकणे आवश्यक आहे. मधुमेह आणि एचआयव्हीसारखे इतर आजार असल्यास त्यावरही उपचार घेणे गरजेचे ठरते. डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे. क्षयरोगावरील उपचार बंद केल्यास ‘मल्टिड्रग रेझिस्टन्ट टयूबरक्युलोसिस’ (एमडीआर टीबी) व ‘एक्सटेंडेड ड्रग रेझिस्टन्स ट्यूबरक्युलॉसिस (एक्सडीआर टीबी) होण्याचा धोका असतो. क्षयरोगाचे लवकर निदान व उपचार पूर्ण करणे आवश्यक आहे.

क्षयरोग निर्मूलनासाठी सरकारची काय भूमिका?

२०२५ पर्यंत भारतातून क्षयरोग पूर्णपणे नष्ट करण्याचे केंद्र सरकाचे लक्ष्य आहे. हे आव्हानात्मक असले तरी नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास ते शक्य आहे. केंद्र सरकारकडून क्षयरोगाची चाचणी आणि औषधाेपचार मोफत केले जातात. चांगल्या पोषणासाठी आर्थिक मदतही केली जाते. यासाठी जनतेने सहकार्य करणे गरजेचे आहे. क्षयरुग्णांसाठी निक्षय मित्र योजना सरकारच्या वतीने राबविण्यात येते. गरीब, गरजू क्षयरुग्णांना कोरड्या धान्यांचा संच देण्यासाठी या अभियानात समाजसेवी, स्वयंसेवी संस्था, कंपन्या सहभागी होऊन मदत देऊ शकतात. या अभियानाच्या माध्यमातून असंख्य गरजू क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी मदतीचा हात दिला जात आहे.

prabodh.deshpande@expressindia.com