Premium

स्वतंत्र भारताला ‘इंडिया’ म्हणण्यास जिनांनी केला होता विरोध! जाणून घ्या भारत आणि इंडियामधील फरक…

पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या मोहम्मद अली जिना यांनीही भारत देशाला इंडिया म्हणण्यास विरोध केला होता. हा विरोध करण्यामागे कोणती कारणे होती, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

Jinnah was opposed to the name India
स्वतंत्र भारताला 'इंडिया' म्हणण्यास जिनांनी केला होता विरोध!

सध्या भारत, इंडिया, हिंदुस्थान यावर विविध अंगांनी चर्चा होत आहेत. विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ हे नाव धारण केल्यामुळे भारताला असणाऱ्या ‘इंडिया’ या उपनामात बदल करण्यात येत आहे. परंतु, भारताला इंडिया म्हणण्यास याआधीही विरोध झालेला होता. पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या मोहम्मद अली जिना यांनीही भारत देशाला इंडिया म्हणण्यास विरोध केला होता. हा विरोध करण्यामागे कोणती कारणे होती, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवार, दि. ५ सप्टेंबर रोजी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी, ”मोहम्मद अली जिना यांनीही भारत राष्ट्राला ‘इंडिया’ म्हणण्यास विरोध केला होता. कारण, भारताला इंडिया म्हटल्यामुळे भारत हा ब्रिटिशांचा उत्तराधिकारी आहे आणि पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र वाटेल, असे त्यांचे मत होते,” याची आठवण करून दिली. जी-२० समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ९ सप्टेंबर रोजी वेगवेगळ्या मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आल्याने देशाच्या राजकारणात मोठे वादंग माजले आहेत. मोदी सरकारकडून देशाचे नाव बदलण्याचा घाट घातला जात असून, विरोधकांच्या ‘इंडिया’ या आघाडीला भाजपा पक्ष घाबरला आहे, असा दावा विरोधक करीत आहेत. तर भाजपाच्या नेत्यांकडून तुम्हाला भारत या नावात काय अडचण आहे, असा सवाल विरोधकांना केला आहे. ‘इंडिया’ शब्दाच्या ऐवजी ‘भारत’ शब्दाचा प्रयोग करण्यात येत आहे. असे करणे पाकिस्तानच्या विचारांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, असाही तर्क विरोधक लावत आहेत. आता इंडिया या शब्दाच्या ऐवजी भारत म्हणणे, हे पाकिस्तानी विचारधारेला पूरक कसे आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why pakistans founder jinnah was opposed to the name india for the independent indian nation vvk

First published on: 07-09-2023 at 13:14 IST
Next Story
तिलकऐवजी सूर्यकुमार; ‘अनफिट’ राहुलला पसंती; चहल, अश्विनकडे दुर्लक्ष! भारताचा संघ कितपत संतुलित?