भारतीय चलनाचे मूल्य आज ७९.५० रुपये प्रति डॉलरवर पोहोचले आहे. देश आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा रुपयाचे मूल्य एक डॉलर इतके होते. या ७५ वर्षांत रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ८० च्या पुढे गेले आहे. देशाच्या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत एकदा सांगितले होते की, जेव्हा देशाचे चलन घसरते तेव्हा रुपयाचे नुकसान तर होतेच, पण त्या देशाच्या प्रतिष्ठेचीही घसरण होते. मात्र, भारतीय चलन दिवसेंदिवस इतके कमकुवत का होत आहे? त्याचा आतापर्यंतचा इतिहास कसा आहे? आपण जाणून घेऊया.

हेही वाचा- विश्लेषण : ‘The Satanic Verses’ चे लेखक सलमान रश्दींवर हल्ला करणारा हादी मतर नेमका आहे तरी कोण? हल्ल्याचं कारण काय?

400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ

स्वातंत्र्यानंतर रुपयाचे अवमूल्यन

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी एका डॉलरची किंमत एक रुपया होती. पण भारत स्वतंत्र झाल्यावर अर्थव्यवस्था चालवण्यासाठी पुरेसा पैसा भारताकडे नव्हता. त्यावेळी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विदेशी व्यापार वाढवण्यासाठी रुपयाचे मूल्य कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथमच एका डॉलरची किंमत ४.७६ रुपये झाली होती.

त्याकाळी केंद्र सरकारकडून रुपयाच्या मूल्यावर लक्ष

१९६२ पर्यंत रुपयाच्या मूल्यात कोणताही बदल झाला नाही. परंतु जेव्हा भारताने १९६२ आणि त्यानंतर १९६५ चे युद्ध झाले तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला होता. १९६६ मध्ये परकीय चलन बाजारात भारतीय रुपयाचे मूल्य ६.३६ रुपये झाले. १९७६ पर्यंत सरकारने पुन्हा एकदा रुपयाचे मूल्य कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका डॉलरची किंमत ७.५०रुपये झाली.

हेही वाचा- विश्लेषण: ट्रम्प यांच्याविरुद्ध आरोपांचा चक्रव्यूह!

त्यावेळी सरकार रुपयाच्या मूल्यावर नजर ठेवत असे. जेव्हा बाजारात रुपयाचे मूल्य एका डॉलरच्या बरोबरीने किती होईल त्याला स्थिर विनिमय दर प्रणाली (Fixed Exchange Rate System) म्हणतात. त्यानंतर १९७४ मध्ये अशी वेळ आली, जेव्हा रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ८.१० रुपयांपर्यंत खाली आले. त्यानंतर रुपयाचे मूल्य काही वर्षे स्थिर राहिले. १९८३ मध्ये, जेव्हा रुपया १०.१ च्या पातळीवर पोहोचला तेव्हा त्याच्या किंमती पुन्हा एकदा कमी झाली.

हेही वाचा- विश्लेषण : महाकाय अशनीच्या आघातामुळे पृथ्वीवर खंड निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे नवे संशोधन प्रसिद्ध

आर्थिक मंदीने पहिल्यांदाच रुपयाचे कंबरडे मोडले

देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच १९९१ मध्ये मंदी आली. तेव्हा केंद्रात नरसिंह राव यांचे सरकार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक उदारीकरण सुरू झाले. ज्यामुळे विक्रमी घसरणीसह रुपया २२.७४ प्रति डॉलरवर पोहोचला. दोन वर्षांनंतर रुपया पुन्हा कमकुवत झाला. तेव्हा एका डॉलरची किंमत ३०.४९ रुपये होती. तेव्हापासून रुपयाच्या घसरणीचा ट्रेंड सुरू आहे. १९९४ ते १९९७ पर्यंत रुपयाच्या किमतीत चढउतार होता. त्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपया ३१.३७ ते ३६.३१ रुपयांच्या श्रेणीत राहिला.

मोदी सरकारच्या काळात रुपयाची घसरण

त्यानंतर देशात अटलजींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनीही रुपया मजबूत करण्यासाठी विशेष पाऊल उचलले नाही. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्येही तीच स्थिती राहिली. २००८ मधील जागतिक मंदीच्या काळात भारताला तग धरून ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी रुपया मजबूत करण्यात ते अपयशी ठरले. आता २०१४ पासून केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. या काळात रुपयाच्या मूल्यात २५.३९% घसरण झाली आहे. आज भारतीय चलन प्रति डॉलर ८० रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. तो कधी स्थिर होईल, हे आताच सांगणे कठीण आहे.