नागपूर शहरात व जिल्ह्यात मिळून वर्षाला सातशे ते आठशे जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मागील दोन वर्षाच्या तुलनेत अपघात बळींची संख्या चार टक्के कमी झाली असली तरी ‘अपघातमुक्त शहर’ करण्यासाठी अधिक उपाययोजनांची गरज आहे.

नागपूर जिल्ह्यातून किती महामार्ग जातात?

नागपूरमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आणि सात जातात. शिवाय नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची त्यात भर पडली.राष्ट्रीय महामार्ग क्रं. ६ कोलकात्याकडे जाणारा असून गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून जातो. १९४९ किमी लांबीचा हा मार्ग सुरत, धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, दुर्ग, रायपूर, महासमुंद, संबलपूर, खरगपूर व कोलकाता या शहरांना जोडतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात नागपूरमधून जातो.

Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
pune city traffic route changes marathi news
पुणे: शहरातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद, मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
bike rider looted at sangam bridge area
लोहमार्ग पोलीस मुख्यालयासमोर दुचाकीस्वार तरुणाची लूट, संगम पूल परिसरातील घटना
Thane Multi Storey vehicle Parking
ठाणे : वागळे इस्टेटमधील बहुमजली वाहनतळाची क्षमता वाढणार

हेही वाचा : विश्लेषण: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांचे आश्वासन कागदावरच? वसतिगृहांअभावी कशी होतेय परवड?

मध्यवर्ती स्थानामुळे वाहनांची वर्दळ…

नागपूर देशाच्या मध्यस्थानी असल्याने येथून देशाच्या चारही भागांत जाण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि विमान मार्गाची सुविधा आहे. त्यामुळे अनेक मोठ्या कंपन्यांची गोदामे शहरात असून येथून विविध ठिकाणी मालवाहतूक केली जाते. याशिवाय महामार्गांमुळे इतर राज्यातील वाहनेही जिल्ह्यातून जात असतात. याशिवाय आशिया खंडातील सर्वात मोठे धान्य व फळ मार्केट कळमना बाजार नागपूरमध्येच आहे. येथे विविध राज्यातून शेतमाल व धान्य घेऊन येणारी वाहने येत असतात. नव्याने झालेला समृद्धी महामार्ग हा अन्य राज्यातून आलेल्या व मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनांसाठी वेळेची बचत करणारा असल्याने मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि अन्य राज्यातील मालवाहू ट्रक ‘समृद्धी’वर जाण्याआधी जिल्ह्यातील विविध जिल्हा मार्गांवरून प्रवास करतात. त्यामुळे जिल्ह्यात मालवाहू वाहनांची वर्दळ अधिक असते.

नागपूर जिल्ह्यातील अपघात बळी किती?

‘सेव्ह लाईफ’ या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी नागपूर ग्रामीणमध्ये ४४० जणांना रस्ते अपघातात प्राण गमवावा लागला. नागपूर शहरामध्ये ३०८ मृत्यू झाले. एकूण मागच्या वर्षी ७४८ जणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात ११२ पादचाऱ्यांचा समावेश आहे. शहरातील रस्त्यांवर ७३ जीवघेण्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात १७१ मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेने, १२१ मृत्यू वाहनाला मागून धडक झालेल्या अपघाताने, २१ मृत्यू दोन्ही वाहनांची धडक झाल्याने, १९ मृत्यू वाहनांला बाजूने धडक दिल्याने तर १९ मृत्यू हे वाहनाच्या मध्ये प्राणी आल्याने झालेल्या अपघातात झाले आहेत. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये अपघाताच्या संख्येत चार टक्के घट झाल्याचा दावा संस्थेने केला आहे.

हेही वाचा : LGBTQ खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये धमक्या? ग्राइंडर डेटिंग अ‍ॅप ब्लॉक करण्यामागचे खरे कारण काय?

देशातील आकडेवारी काय सांगते?

देशात वर्षाला ५ लाख लोकांचा अपघातात मृत्यू होतो. यातील ६५ टक्के मृत्यू हा १८ ते ३५ या युवा वयोगटातील युवकांचा आहे. ‘हिट ॲण्ड रन’ अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ढाब्यांवरील मद्यविक्री कारणीभूत?

राष्ट्रीय व राज्य महामार्गावर अनेक ढाबे असतात. त्या ढाब्यांवर रात्री जेवणासाठी अनेक वाहने थांबतात. काही ढाब्यांवर बेकायदेशीरपणे मद्य विक्री तसेच मद्यप्राशनासाठी सोय केली जाते. मद्यप्राशन करून पुढे प्रवासाला निघणाऱ्या वाहनांचा अपघात होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उत्पादन शुल्क विभागासह पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्याचे एक पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

हेही वाचा : तज्ज्ञ विश्लेषण: थोड्या वेळात जास्त पाऊस हा प्रकार पुढील काळात वाढणार?

अपघातप्रवण स्थळांवर काय उपायोजना?

नागपूर शहर आणि ग्रामीण भागात स्वयंसेवी संस्था आणि पोलीस व इतर संबंधित शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून अपघातप्रवण स्थळे शोधण्यात आली. त्या ठिकाणी अपघात का होतात, याची कारणे शोधून तेथे उपाययोजना करण्यात आल्या. गतिरोधक, सूचना फलक आणि तत्सम उपाययोजनेतून अपघातावर आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात आल्याने अपघाताच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागातून जाणारे महामार्ग छोट्या-छोट्या गावातून जातात. अनेकदा रस्त्यावरील वीज दिवे बंद असल्याने अंधारात रस्ते ओलांडणारा मनुष्य दिसत नाही. त्यामुळे अपघात होतात. रस्त्यालगत सुरक्षा कठडे लावल्यास दुर्घटना टळू शकते. या दृष्टीने महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना केल्या आहेत.

‘अपघातमुक्त शहर’ योजनेच्या बैठकीत काय?

अपघात झाल्यानंतर वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी तसेच अपघातग्रस्ताला त्वरित वैद्यकीय मदत घटनास्थळीच मिळण्यासाठीचा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय विभाग, पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधून यंत्रणा तयार करावी, जेणेकरून अपघातानंतरच्या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांचा जीव वाचेल. ५७ अपघातप्रवण स्थळांमध्ये सुधारणा करणे, वर्दळीच्या रस्त्यावर फुट ओवर ब्रिजच्या माध्यमातून दुचाकी तसेच शालेय विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता पार करण्यासाठीची सुविधा करावी, पदपथावरील अतिक्रमण हे अपघातास कारणीभूत ठरते. त्यामुळे पोलीस संरक्षणात अतिक्रमण काढावे, या व अन्य सूचना बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा : विश्लेषण : मनू भाकरचे ऐतिहासिक दुसरे ऑलिम्पिक पदक… सरबज्योतचीही पदककमाई…

गडकरींचा ‘सुरत पॅटर्न’ काय आहे?

गुजरातमधील सुरत शहरात वाहतूक व्यवस्थेचे नियोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जाते. लोकसहभागातून वाहतूक नियंत्रण हा त्यामागचा उद्देश आहे. याच धर्तीवर नागपूरसह इतरही जिल्ह्यात सुरत पॅटर्न राबवण्याचा मानस केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एक चमू पाठवण्यात येणार आहे.