scorecardresearch

Premium

विश्लेषण: आता खरंच ‘नो टेन्शन’! तणावातही आनंदी ठेवते डेन्मार्कची लोकप्रिय ‘Hygge’ पद्धत; नेमकं हे घडतं कसं?

How To Cure Depression: डेन्मार्कचे रहिवासी हे यासाठी हायजी ही पद्धत वापरतात, यावर एक खास पुस्तकही प्रसिद्ध आहे. नेमकी ही पद्धत काय व आपणही आनंदी राहण्यासाठी ती कशी वापरू शकता हे आज आपण पाहणार आहोत..

How To cure Depression Mental Peace Stress Denmark Famous Hygge Lifestyle To Stay Happy
How To cure Depression Mental Peace Stress Denmark Famous Hygge Lifestyle To Stay Happy (फोटो: Unsplash)

How To Stay Happy: जर कधी एखादी व्यक्ती कामामुळे किंवा वैयक्तिक कारणाने उदास दिसली की अनेकजण त्यांना टेन्शन घेऊ नको, स्ट्रेस घ्यायचा नाही, ताण विसरून जा असे सल्ले देतात. खरंतर त्या व्यक्तीला शक्य असतं तर त्यांनी आधीच हे करून पाहिलं असतं पण ही गोष्ट अनेकांच्या डोक्यातून निघून जाते. दुसरं म्हणजे आपण कितीही ठरवलं तरी काही गोष्टींचा ताण हा टाळण्यासारखा नसतो त्यामुळे अशावेळी उदास राहावं का? तर नाही. तुम्हाला माहित आहे का? डेन्मार्क हा देश जगभरातील काही सर्वात आनंदी देशांपैकी एक मानलं जातो. डेन्मार्कचे रहिवासी हे यासाठी हायजी ही पद्धत वापरतात, यावर एक खास पुस्तकही प्रसिद्ध आहे. नेमकी ही पद्धत काय व आपणही आनंदी राहण्यासाठी ती कशी वापरू शकता हे आज आपण पाहणार आहोत..

तणावावर मात करण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी, बहुतेक नॉर्डिक देश Hygge या जीवनशैलीचे अनुसरण करतात. याचा अगदी सोपा अर्थ म्हणजे तुमच्या आनंदासाठी तुम्ही स्वतः तसे आपुलकीचे, शांतीचे व प्रेमाचे वातावरण तयार करणे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

Hygge म्हणजे काय त्याची सुरुवात कशी झाली?

डॅनिश संस्कृतीबाबत सविस्तर माहिती देण्याऱ्या वेबसाइटनुसार, “हायग्ज हा शब्द १८०० च्या शतकात वापरण्यात आला होता. Hygge या संकल्पनेच्या विविध व्याख्या मध्य युगातही आढळून आल्या आहेत. या मूळ नॉर्स शब्दाचा अर्थ “बाहेरील जगापासून संरक्षित राहणे” असा होतो.

२०१७ मध्ये, ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये डॅनिश शब्द “Hygge” चा समावेश करण्यात आला होता. डेन्मार्क देशात विशेषतः हिवाळ्यात थंडीमुळे घराबाहेर पडणे टाळले जाते अशावेळी बंद खोलीत अनेकांना नैराश्य जाणवू नये म्हणून Hygge ही जीवनशैली निर्माण करण्यात आली होती. मात्र यातील काही सवयी आपण वर्षभर वापरून पाहू शकता

डॅनिश लोक Hygge चे अनुसरण कसे करतात?

Hygge डेन्मार्क मध्ये खूप प्रसिद्ध आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही या संकल्पनेचे खूप कौतुक केले जाते. डॅनिश लोक Hygge नुसार स्वतःसाठी आरामदायी वातावरणा तयार करतात. आराम करतात, कुटुंबियांसोबत वेळ घालवतात. घरातील नियमित कामे करतात. लोक त्यांच्या दैनंदिन व्यस्त रुटीनमधून वेळ काढून त्यांच्या प्रियजनांसोबत किंवा स्वतःसोबत वेळ घालवतात. ध्यानधारणा करून शांतता अनुभवण्यासाठी हा एक अनौपचारिक वेळ ठरवून दिला जातो. दिवसासाठी कोणता अजेंडा न ठेवता मेजवानी, वाईन डाईन अशा साध्या गोष्टी करून आनंद अनुभवला जातो.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आनंदी देश, ‘डेन्मार्क’

वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट सर्वेक्षण २०२२ नुसार, डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकाचा आनंदी देश आहे. गेल्या १० वर्षांपासून आघाडीच्या आनंदी देशांमध्ये डेन्मार्कचे स्थान कायम राखले आहे. भ्रष्टाचाराची पातळी, डिस्टोपिया, आपल्याला हवे तसे आयुष्य निवडण्याचे स्वातंत्र्य, निरोगी आयुर्मान, सोशल लाईफ आणि दरडोई जीडीपी या आधारावर आनंदी देशांची क्रमवारी लावली जाते.

उदासीनता म्हणजे विनोद नाही

डेन्मार्कसह नॉर्डिक देशांमध्ये जेव्हा सूर्यप्रकाशाची कमतरता असते, तेव्हा लोकांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या अवस्थेला हिवाळ्यातील उदासीनता म्हणतात. यामुळे सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी) म्हणजे एखाद्या व्यक्तीला अमुक एका हंगामात कमी ऊर्जा, जाणवते, ही अवस्था गंभीर झाल्यास आत्महत्येचे विचार येण्यापर्यंत मानसिक ताण वाढू शकतो. हे केवळ हवामानावरच नाही तर काहीवेळा एखाद्याच्या जुन्या आजारामुळे उद्भवलेल्या मानसिक स्थितीवर अवलंबून असते ज्यात हवामानामुळे आणखी भर पडते.

तरुणांमधील मानसिक विकार

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, १० ते १९ वयोगटातील सातपैकी एक जण मानसिक रोगांनी ग्रस्त आहे. जगभरात १३% लोकसंख्या दीर्घकालीन उदासीनतेने ग्रस्त आहे. तरुणांच्या मानसिक आरोग्यामधील ताणतणावांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी हे सर्वेक्षण केले जाते.

वरील सर्व मुद्दे वाचून आपण स्वतःला व इतरांनाही मदत करू शकता. जर दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळासाठी उदासीनता जाणवत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. तूर्तास आपणही डेन्मार्कची ही पद्धती वापरून पाहू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Winter tips how to cure depression mental peace stress denmark famous hygge lifestyle to stay happy svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×