29 February 2020

News Flash

कोणत्या अ‍ॅक्सेसरीज घेऊ?

माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि त्यासाठी मलाही एक हेअर अ‍ॅक्सेसरीज घालायची आहे.

सध्या हेअर अ‍ॅक्सेसरीजची खूप चर्चा आहे. पण फोटोमध्ये त्या दिसायला कितीही सुंदर दिसल्या तरी प्रत्यक्षात त्यांची निवड करण आणि केसांमध्ये योग्य पद्धतीने खोवणं कठीण असतं. माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि त्यासाठी मलाही एक हेअर अ‍ॅक्सेसरीज घालायची आहे. त्यात कोणते पर्याय आहेत?
– सुरुची नांदिवडेकर, २४.

सुरुची, आपल्याकडे हेअर अ‍ॅक्सेसरीजचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. सध्या त्या ट्रेंडमध्ये असल्या तरी पूर्वीपासून खोपा, झुमर, बोरा, माथापट्टी असे हेअर अ‍ॅक्सेसरीजचे वेगवेगळे प्रकार लग्नात किंवा सणसमारंभात बायका सर्रास वापरायच्या. मध्यंतरी रंगीत खडय़ांचे हेअरपीस बाजारात आले होते. आजही कित्येक कार्यक्रमात बायका हे हेअरपीस मिरवताना दिसतात. पण आता जुन्या, पारंपरिक हेअर अ‍ॅक्सेसरीजचा ट्रेंड पुन्हा बाजारात आला आहे. त्यामुळे मोत्याची वेल, आंबाडय़ामध्ये खोवला जाणारा खोपा, मांगटिका आणि चेन यांना जोडून होणारा बोरा, खास मुघालाई स्टाइलचे झुमर यांचा हेअरस्टाइलमध्ये आवर्जून वापर केला जातो. तुझ्या हेअरस्टाईलनुसार अ‍ॅक्सेसरी तू निवडू शकतेस, पण तू म्हणतेस तसं या अ‍ॅक्सेसरीज खोवताना त्रासदायक होऊ  शकतात. त्यामुळे खरेदी करताना थोडा विचार करण गरजेचं आहे. खोपासारख्या केसात खोवण्याच्या अ‍ॅक्सेसरीजचे दांडे टोकदार नसतील याची खात्री करून घे. ते केसाला इजा पोहचवू शकतात. तसंच या दांडय़ाची लांबी तुझ्या आंबाडय़ापेक्षा जास्त नको. कित्येकदा मांगटिकाला चेनएवजी छोटं हुक दिलं जातं. त्यामुळे मांगटिका केसात बसवताना समोरच्या बाजूला पिना लावल्याने केस चपटे होऊन हेअरस्टाईल बिघडते. याची काळजी मात्र नक्की घे.

मला लेटेस्ट स्टाइलचे कपडे घ्यायला आवडतं. पण काही स्टाइल्स ठरावीक काळापुरत्या येतात आणि नंतर ते कपडे आऊट ऑफ फॅशन गेल्याने तसेच पडून राहतात. मग असे कपडे नव्याने, लेटेस्ट स्टाइलनुसार कसे वापरता येतील?
–  गंधाली जाधव, २०.

गंधाली कपाटात वाढत जाणारा कपडय़ांचा ढीग ही जवळपास सगळ्याच मुलींची समस्या असते. नवीन ट्रेंड म्हणून आपण हौसेने कपडे विकत घेतो, पण एकदा ती स्टाईल गेली की कपडे कपाटात पडून राहतात. त्या कपडय़ांच्या किमती पाहता ते टाकून देणे ही नकोसे वाटते. मग अशावेळी छोटय़ा क्लृप्त्या तुझ्या कामी येऊ  शकतात. त्याची सुरुवात शॉपिंगपासून करावी लागेल. नवीन ट्रेंडचे कपडे विकत घेत असताना तुझ्या कपाटात कोणते पडून राहिलेले कपडे आहेत याचं गणित डोक्यात पक्कं असू देत. जेणेकरून जुन्या कपडय़ांसोबत त्यांचं स्टायलिंग कसं करता येईल याचा अंदाज तुला बांधता येईल. उदारणार्थ, सध्या रंगीत, प्रिंटेड स्कर्ट्स ट्रेंडमध्ये आहेत. कपाटातील जुने टॉप, कुर्ते तू त्याच्यासोबत नक्कीच घालू शकतेस. त्यांच्या रंगसंगतीनुसार तू नवीन स्कर्ट कोणत्या रंगाचा घ्यायचा हे ठरव. लेअरिंगमध्ये जुन्या कपडय़ांना बॅकफूट करून ते पुन्हा वापरता येतात. इंटरनेटवर घरच्या घरी कपडय़ांवर प्रयोग करता येणारे (डीआयवाय) व्हिडीओ पहायला मिळतात. असे प्रयोग जुन्या कपडय़ांवर नक्कीच करता येतील. वॉश आऊट डेनिम्सचा ट्रेंड आता गेलाय पण टोन्र्ड डेनिम्सचा ट्रेंड मात्र आहेच की. घराच्या घरी टोन्र्ड डेनिम सहज करता येतात. अशा काही सोप्प्या क्लृप्त्या वापरून तू तुझं बजेटपण आवाक्यात आणू शकतेस आणि हटके स्टायलिंगपण करू शकतेस.

आवाहन : फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा  ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.

मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 4, 2015 1:08 am

Web Title: fashion accessories 2
टॅग Fashion
Next Stories
1 श्रग स्टायलिंग
2 हेअरस्टाइल कशी निवडू?
3 रंग माझा कोणता?
X
Just Now!
X