21 March 2019

News Flash

FIFA World Cup 2018 : एका हेअरकटसाठी मेस्सीच्या चाहत्याला १२ हजाराला कात्री

मेस्सीच्या एका अतरंगी चाहत्याने मेस्सीच्या पोर्टेटची हेअरस्टाईल केली आहे. या हेअरकटसाठी त्याला तब्बल १२ हजार रुपये मोजावे लागले.

FIFA World Cup 2018 : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अनेक प्रबळ दावेदार दिसत आहेत. सर्वच संघ आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करताना दिसतील, यात शंका नाही. कोणताही खेळाचा निकाल हा अंतिम क्षणापर्यंत ठरत नाही. गतविजेत्या जर्मनीबरोबरच ब्राझील, स्पेन, अर्जेटिना, फ्रान्स, उरुग्वे, बेल्जीयम या क्रमवारीतील पहिल्या १५ संघांकडे स्पर्धेत विशेष लक्ष राहणारच आहे. पण त्याबरोबरच लक्ष असेल ते विविध अतरंगी चाहत्यांकडे…

अशाच एका चाहत्याने सध्या सोशल मीडियावर साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. अर्जेटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी हा सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. प्रत्येक चाहता आपापल्या परीने आपण सर्वात मोठे चाहते असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. तशातच सर्बियाच्या एका नाव्ह्याने मेस्सीच्या एका अतरंगी फॅनच्या डोक्यावर चक्क मेस्सी कोरला आहे.

सर्बियाचा मारिओ ह्वाला या नाव्ह्याने मेस्सीच्या एका अतरंगी चाहत्याला मेस्सीच्या पोर्टेटची हेअरस्टाईल करून दिली आहे. या हेअरकटसाठी या चाहत्याला तब्बल १५० युरोज म्हणजेच सुमारे १२ हजार रुपये मोजावे लागले. या हेअरकटला पाच ते सात तास लागले. नऊ वर्षांपूर्वी काहीतरी वेगळं करण्याची कल्पना सुचल्याचे मारिओ ह्वालाने सांगितले.

 

या हेअरकटनंतर अनेकांनी त्याच्याबरोबर सेल्फीही काढला.

 

गेल्या नऊ वर्षांपासून मी असे करत आहे. माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी असे विविध हेअरस्टाईल करण्याचा सल्ला देतो. काहीतरी वेगळं करावं, या उद्देशाने मी त्यांना हे सारे दाखवतो. त्यांना पसंत पडले, तर ते असे हेअरकट करून घेतात, असे ह्वालाने सांगितले.

First Published on June 14, 2018 4:47 pm

Web Title: barber charge rs 12000 for messi haircut on fan head
टॅग Charge,Messi