22 October 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : तुल्यबळांच्या लढतीत डेन्मार्क-पेरू समोरासमोर

क-गटाच्या लढतीत डेन्मार्कशी दोन हात करायचे आहेत.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सारांस्क : तब्बल ३६ वर्षांनंतर विश्वचषकाच्या रणधुमाळीत परतलेल्या पेरू संघाला शनिवारी होणाऱ्या क-गटाच्या लढतीत डेन्मार्कशी दोन हात करायचे आहेत. फिफाच्या जागतिक क्रमवारीत अनुक्रमे ११व्या आणि १२व्या स्थानी असणाऱ्या पेरू व डेन्मार्क यांच्यातील सामन्याला तुल्यबळांची लढत असे स्वरूप प्राप्त झाल्याने कोणता संघ यामध्ये बाजी मारतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

उत्तेजकांच्या चाचणीत दोषी आढळलेल्या पावलो ग्वेरेरो १४ महिन्यांनंतर परतल्याने पेरूची काहीशी चिंता कमी झालेली आहे. त्याशिवाय पेरूला विश्वचषकाची पात्रता मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या जेफरसन फरफानवरही पेरूचे भवितव्य अवलंबून आहे. डेन्मार्कने २०१६ नंतर एकाही सामन्यात पराभव पत्करला नसल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 2:52 am

Web Title: denmark vs peru fifa world cup 2018
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : २०० संघ नि २० विश्वचषक.. तरी आठच जगज्जेते कसे?
2 FIFA World Cup 2018: रोनाल्डोची विक्रमी हॅट्ट्रिक; स्पेन विरुद्ध पोर्तुगाल सामना बरोबरीत
3 FIFA World Cup 2018 IRAN VS MOROCCO: इराणला कडवी टक्कर दिली पण शेवटच्या मिनिटांमध्ये मोरोक्कोचा झाला घात
Just Now!
X