News Flash

FIFA World Cup 2018 : …म्हणून स्पर्धेसाठी पात्र ठरूनही भारतीय संघ खेळला नाही १९५०चा वर्ल्डकप!

१९५० साली झालेल्या FIFA World Cup स्पर्धेसाठी भारताचा संघ पात्र ठरला होता. तरीदेखील भारताने या स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला होता.

FIFA World Cup 2018 : २१वी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा १४ जूनपासून रशियात सुरु होणार आहे. मात्र FIFA World Cup 2018 मध्ये भारताला या स्पर्धेसाठी पात्र ठरता आलेले नाही. नियमित फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत भारताला एकदाही सहभागी होण्याची संधी मिळालेली नाही. २०१७मध्ये १७ वर्षाखालील फुटबॉल संघाला स्थान मिळाले होते. मात्र वरिष्ठ संघाला अद्याप या स्पर्धेत संधी मिळालेली नाही. पण, १९५० साली झालेल्या FIFA World Cup स्पर्धेसाठी भारताचा संघ पात्र ठरला होता. तरीदेखील भारताने या स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिला होता.

या घटनेबाबत अनेकदा असे सांगितले जाते की भारतीय संघ हा अनवाणी पायी विश्वचषक स्पर्धा खेळणार होता, म्हणून भारताला सहभागाची संधी मिळाली नाही. मात्र, या मागील खरी कथा काहीतरी वेगळीच आहे. हा विश्वचषक ब्राझीलमध्ये खेळण्यात येणार होता आणि या विश्वचषकासाठी भारताने प्रवास करून ब्राझीलला यावे, असे ब्राझीलचे म्हणणे होते. त्यामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने या स्पर्धेसाठी संघ न पाठवण्याला पसंती दिली.

१९५० च्या फिफा विश्वचषकासाठी भारताचा संघ (फोटो सौजन्य – ट्विटर / दूरदर्शन स्पोर्ट्स)

त्या काळी ऑलिम्पिक स्पर्धा या फिफा विश्वचषक स्पर्धेपेक्षा मोठ्या आणि महत्वाच्या असतात, असे भारतीय फुटबॉल महासंघाचे म्हणणे होते. त्यामुळे फिफाच्या चौथ्या विश्वचषक स्पर्धेत भारताला पाठवण्यात आले नाही. तसेच, ब्राझीलने भारतीय संघाच्या करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. पण जहाजाने एवढ्या लांब आपल्या राष्ट्रीय संघाला पाठवणे, महासंघाला योग्य वाटले नव्हते. त्यामुळे भारतीय संघाचा फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 4:02 pm

Web Title: fifa world cup 1950 india qualified but not featured
टॅग : Football
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : ‘दी रेड डेव्हिल्स’ बेल्जियमची मदार रोमेलू लुकाकूवर
2 FIFA World Cup 2018 TimeTable : सामने पाहण्यासाठी भारतीयांना जागरण करण्याची गरज नाही…
3 FIFA World Cup 2018  : अभिनव ‘व्हिडिओ रेफरल’ तंत्रज्ञान निर्णायक
Just Now!
X