22 October 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : प्रशिक्षक आणि देशीवाद!

पेले, मॅराडोना, रोनाल्डो, मेसी, नेयमार ही रसिकांची दैवतं.

पेले, मॅराडोना, रोनाल्डो, मेसी, नेयमार ही रसिकांची दैवतं. पण फुटबॉलमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा असतो प्रशिक्षक. कोण, कुठे, कसा खेळेल हे प्रशिक्षकच ठरवत असतो. विविध व्यूहरचना आणि  शैलींचं योगदानही प्रशिक्षकांचंच. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, एक वेळ खेळाडूंची उणीव भरून काढता येईल. प्रशिक्षक ही अधिक दीर्घकालीन आणि खर्चीक गुंतवणूक असते. जगज्जेता खेळाडू हा जगज्जेता प्रशिक्षकही बनल्याची उदाहरणं दोनच. ब्राझीलचे मारियो झगालो आणि जर्मनीचे फ्रान्झ बेकेनबाउर. यंदा अशी कामगिरी करण्याची संधी फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिए देशाम्प यांनाही आहे. हल्ली सरसकट परदेशी प्रशिक्षकांवर जबाबदारी टाकण्याची प्रवृत्ती बळावलेली दिसते. पण एक बाब लक्षात ठेवलेली बरी की, आजवरच्या सर्व जगज्जेत्यांचे प्रशिक्षक देशीच होते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 3:05 am

Web Title: fifa world cup 2018 9
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : मेसी-माया!
2 FIFA World Cup 2018 : नियंत्रण सौदीचे, पण विजय रशियाचा
3 FIFA World Cup 2018 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध फ्रान्सचे पारडे जड
Just Now!
X