FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत आता अंतिम १६ संघांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या स्पर्धेत अर्जेंटिना, पोर्तुगाल, फ्रान्स, जपान यासारख्या संघांनी बाद फेरी गाठली आहे, तर गतविजेता जर्मनी, इजिप्त, सेनेगल यासारख्या संघांना स्पर्धेबाहेर जाण्याची वेळ आली आहे. पण या स्पर्धेत आफ्रिकन संघांना एका लाजिरवाण्या कामगिरीचे धनी व्हावे लागले आहे.

या स्पर्धेत इजिप्त, मोरोक्को, नायजेरिया, ट्युनिशिया आणि आता सेनेगल अशा पाच आफ्रिकन उपखंडातील संघांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तब्बल ३६ वर्षांनंतर अशी लाजिरवाणी वेळ आफ्रिकन संघांवर ओढवली आहे.

बुधवारपर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये इजिप्त, मोरोक्को, नायजेरिया आणि ट्युनिशिया या आफ्रिकन संघांना स्पर्धेबाहेर जावे लागले होते. त्यामुळे अनेकांना सेनेगलकडून अपेक्षा होत्या. त्यानुसार सेनेगलचा संघ मैदानात उतरला. पण सेनेगलच्या संघाला एखजी गोल करता आला नाही. त्याउलट कोलंबियाने उत्तरार्धात ७४व्या मिनिटाला गोल करत बाद फेरी गाठली. पण सेनेगलला एकही गोल करता आला नाही.

आफ्रिकन संघांवर १९८२ सालांनंतर प्रथमच अशी नामुष्की ओढवली आहे. त्यानंतर मात्र यंदाच्या विश्वचषकात अशी परिस्थिती आफ्रिकन संघांवर ओढवल्याचे दिसले.