FIFA World Cup 2018: Argentinas former captain Diego Maradona cries after Argentina suffers humiliating World Cup loss against Croatia: फुटबॉल वर्ल्डकपमधील धक्कादायक निकालांची मालिका काल रात्री झालेल्या अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया सामन्याच्या निकालातही पहायला मिळाली. ड गटातील महत्त्वाच्या लढतीमध्ये क्रोएशियाने अर्जेंटिनावर ३- ० ने मात केली. या विजयासह क्रोएशियाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले असून अर्जेंटिनाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. हा मानहानिकारक पराभव पचवणे अर्जेंटिनाच्या खेळाडूंबरोबरच चाहत्यांनाही जड जाणार हे स्पष्ट आहे. मात्र काल अर्जेंटिनाचा पराभव समोर दिसताच संघाच्या समर्थकांपैकी एका कट्टर समर्थकाला चक्क रडू कोसळले आणि तो क्षण कॅमेरांनी बरोबर टिपला. हा कट्टर समर्थक म्हणजे १९९६ साली अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारा, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम खेळाडू म्हणून ओळखला जाणारा डिएगो मॅराडोना.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्तापर्यंत या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचे दोन सामने झाले. या दोन्ही समान्यांना मॅराडोनाने आवर्जून हजेरी लावली होती. आईसलँडविरुद्धच्या समान्यातील मॅराडोनाचे सीगार ओढतानाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर सामना बरोबरीत सुटल्यानंतरही मॅराडोनाचा निराश फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र कालच्या लाजिरवाण्या पराभवाने मॅराडोनाला बसल्या जागीच रडू कोसळले. मॅराडोनाचा रडतानाचा हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

क्रोएशियाविरुद्धचा समाना सुरु झाल्यापासून अनेकदा कॅमेराने मॅराडोनाला टिपले.

समाना सुरु झाल्यापासून अनेकदा कॅमेराने मॅराडोनाला टिपले. (फोटो: रॉयटर्स)

मॅराडोनाने मेसीचं नाव लिहीलेली काळ्या रंगाची जर्सी आणली होती. तो ती जर्सी मोठ्या अभिमानाने दाखवत होते.

मॅराडोनाने मेसीचं नाव लिहीलेली काळ्या रंगाची जर्सी आणली होती. (फोटो: गेटी इमेजेस)

 

जेव्हा मैदानात चाहते मेसीचा नावाचा उदोउदो करत होते त्यावेळी मॅराडोनाने गलोल फिरवतात त्याप्रमाणे ती जर्सी हवेत फिरवून इतर चाहत्यांप्रमाणे मेसीच्या नावाचा जल्लोष केला.
मॅराडोनाने जर्सी हवेत फिरवून इतर चाहत्यांप्रमाणे मेसीच्या नावाने जल्लोष केला. (फोटो – गेटी इमेजेस)

या जर्सीच्या पुढील भागावर “I love you, but I’m a mess” हा संदेश त्यांनी मेसीसाठी लिहीला होता.

मात्र फर्स्ट हाफनंतर क्रोएशियाच्या संघाने अर्जेंटिना संघाचा मैदानात पाणउतार केला तसा मॅराडोना यांचा चेहरा पडला.

(फोटो – गेटी इमेजेस)

सामना संपल्यानंतर तर ते जागीच बसले आणि चेहऱ्यावर हात ठेऊन रडू लागले.

(फोटो – गेटी इमेजेस)

डिएगो मॅराडोनाची कारकीर्द ही कितीही वादग्रस्त असली तरी अर्जेन्टिनासाठी खेळताना तो सर्वस्व पणाला लावून खेळायचा. इतकेच नाही तर व्यावसायिक फुटबॉलमध्ये मॅराडोनानं आपली महानता सिद्ध करुन दाखवली आहे. इटलीच्या नापोलीसारख्या संघाला मॅराडोनानं आपल्या कामगिरीच्या जोरावर युरोपमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. मॅराडोनाच्या अर्जेंटिनानं १९८६ साली फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं.

(फोटो – गेटी इमेजेस)

मॅराडोनानंतर मेसी अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक जिंकून देईल अशी भाबडी आशा देशवासियांना होती. गेल्या बारा वर्षांपासून डिएगो मॅराडोनालाही अशीच काहीशी आशी मेसीकडून होती. त्यामुळेच की काय क्रोएशियाविरुद्धचा पराभव समोर पाहत असताना साक्षात मॅराडोनालाही आपले अश्रू अनावर झाल्याचे पहायला मिळाले.

(फोटो – गेटी इमेजेस)

पहिल्या सामन्यात आईसलँडने अर्जेंटिनाला बरोबरीत रोखण्याचा भीम पराक्रम केला तर दुसऱ्या समान्यात क्रोएशियासारख्या लिंबूटिंबू संघाने माजी विश्वविजेत्या संघाला ३-० अशी धूळ चारली. अर्जेंटिनावर मात करत क्रोएशियाने बाद फेरीतील स्थान निश्चित केले आहे. क्रोएशियाच्या खात्यात सहा गुण आहेत. तर अर्जेंटिनाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्यांचे भवितव्य शुक्रवारी होणाऱ्या नायजेरिया विरुद्ध आईसलँड या लढतीवर अवलंबून आहे. अर्जेंटिनाच्या खात्यात दोन सामन्यांनंतर फक्त एक गूण जमा आहे.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018 argentinas former captain diego maradona cries after argentina suffers humiliating world cup loss against croatia
First published on: 22-06-2018 at 11:04 IST