FIFA World Cup 2018 फिफा विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली. खरं तर फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळ आहे. ‘जगातील सर्वाधिक आस्वादला जाणारा सोहळा’ अशी ओळख या खेळाची आहे. जगभरातील विविध देशांतील फुटबॉलप्रेमींना एकत्र आणण्याची, जल्लोष करण्याची ताकद या स्पर्धेमध्ये आहे. या खेळाची क्रेझ जितकी इतर देशांत आहे तितकीच क्रेझ क्रिकेटवेड्या भारतात तुलनेनं कमीच आहे. पण भारतात अशी अनेक राज्यं आहेत जिथे क्रिकेटपेक्षा या खेळाला सर्वाधिक पसंती आहे. यात ईशान्येकडील काही राज्यं आघाडीवर आहेत.

FIFA 2018 : फुटबॉलचा निस्सीम चाहता, चहाविक्रेत्यानं अर्जेंटिना संघाच्या प्रेमापोटी केला घराचा कायापालट

तर कोलकाता, केरळनंतर आता आसाममधल्या एका फुटबॉलवेड्या चाहत्यानं चक्क १५ लाख उसने घेऊन स्टेडिअम बांधलं आहे. पुतूल बोराह असं या फुटबॉलप्रेमीचं नाव असून ते ५३ वर्षांचे आहे. आसाममध्ये त्यांचा व्यवसायदेखील आहे. जर्मनी संघाचे ते निस्सिम चाहते आहेत. आपल्या अंगणात त्यांनी पाचशे लोक बसू शकतील एवढं मोठ स्टेडिअम बांधलं आहे. तिथे मोठ्या स्क्रीनही लावण्यात आल्या आहेत.

FIFA World Cup 2018: जर्मनी विरुद्ध ३५ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे मेक्सिकोमध्ये झाला भूकंप

क्रिकेटचे सामने रशियात जाऊन लोक पाहून शकत नाही. त्यामुळे लोकांना हे सामने एका छताखाली पाहता यावे यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन स्टेडिअम बांधलं आहे. या ठिकाणी असंख्य फुटबॉलप्रेमी एकत्र जमतात आणि सामन्यांचा आस्वाद घेतात असंही पुतूल म्हणाले. पुतूल फुटबॉल खेळाचे चाहते आहेत आणि गेल्या २६ वर्षांपासून ते असे विविध प्रयोग राबवत आहेत. यावेळी जर्मनीनं वर्ल्डकप जिंकावा अशी त्यांची इच्छा आहे.