02 March 2021

News Flash

FIFA World Cup 2018: बेल्जियमकडून इंग्लंड पराभूत पण दोन्ही संघ बादफेरीत दाखल

बादफेरीत इंग्लंडचा कोलंबियाशी ३ जुलै रोजी सामना होईल. तर बेल्जियमचा संघ जपानविरोधात २ जुलैला भिडेल.

बेल्जियमच्या अदनान जानुझाजने ५१ व्या मिनिटाला गोल केला. हा गोल निर्णायक सिद्ध झाला. बेल्जियमने याच गोलच्या जोरावर सामना १-० ने जिंकला. REUTERS/Fabrizio Bensch

बेल्जियम संघाने शानदार कामगिरी करत फिफा विश्वचषकातील ‘ग’ गटातील सामन्यात इंग्लंडला १-० ने पराभूत केले. या विजयाबरोबर ‘ग’ गटात बेल्जियम संघाने अव्वलस्थानी राहत बादफेरीत प्रवेश केला. इंग्लंडचा पराभव होऊनही त्यांनी बादफेरीत प्रवेश केला आहे. या गटातून ट्युनिशिया आणि पनामा हे दोन्ही संघ स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. ट्युनिशियाने गटातील अंतिम सामन्यात पनामाचा २-१ ने पराभव केला.

बादफेरीत इंग्लंडचा कोलंबियाशी ३ जुलै रोजी सामना होईल. तर बेल्जियमचा संघ जपानविरोधात २ जुलैला भिडेल. जिंकणारा संघ उप-उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

Next Stories
1 FIFA World Cup 2018 : बाद.. जगाचा अस्त.. नि:शब्द..!
2 FIFA World Cup 2018  : जर्मनीचे ‘स्टॅलिनग्राड’ का झाले?
3 2018 fifa World Cup : रंगत-संगत
Just Now!
X