पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलने शानदार कामगिरी करत फिफा विश्वचषकाच्या ‘इ’ गटात सर्बियाला २-० ने नमवत बाद फेरीत प्रवेश केला आहे. या विजयाबरोबर ब्राझीलने ‘इ’ गटात अव्वल स्थान पटकावले. ब्राझीलचा आता उप-उपांत्य फेरीत मेक्सिकोशी सामना होईल. याच गटातून बादफेरी गाठणारा दुसरा संघ स्वित्झर्लंड ठरला. कोस्टा रिकाबरोबर झालेला त्यांचा सामना २-२ असा बरोबरीत सुटला.