News Flash

FIFA World Cup 2018: ब्राझीलचा मेक्सिकोला ‘दे मार’, २-०ने विजयी

ब्राझीलने सुरूवातीपासूनच सामन्यावर आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. विश्वचषकात मेक्सिकोला ब्राझीलला एकदाही पराभूत  करता आलेले नाही.

दुसऱ्या हाफमध्ये ब्राझीलने वेगवान सुरूवात केली आणि नेयमारने आपला करिष्मा दाखवला. त्याने ५१ व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलला १-०ने आघाडी मिळवून दिली. (Source: Reuters)

फिफा विश्वचषकाचा पाच वेळा चॅम्पियन असलेला ब्राझीलचा संघ पुन्हा एकदा मेक्सिकोवर वरचढ ठरला. नेयमार आणि फिरमिनोच्या गोलमुळे ब्राझीलने मेक्सिकोवर २-० असा विजय मिळवला. हा सामना एरिना स्टेडिअमवर खेळवला गेला.  अपेक्षेप्रमाणे नेयमारनेच ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या हाफमध्ये नेयमारने गोल करत ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. विश्वचषकात मेक्सिकोला ब्राझीलला एकदाही पराभूत  करता आलेले नाही. तीच परंपरा ब्राझीलच्या संघाने आजही कायम ठेवली.

८९ व्या मिनिटाला ब्राझीलने आणखी एक गोल करत आघाडी २-० ने वाढवली. नेमारने गोलपोस्ट जवळ फिरमिनोकडे चेंडू पास केला. फिरमिनोने अगदी सहजपणे चेंडू थेट नेटमध्ये धाडला. मेसी आणि रोनाल्डोपेक्षा नेमार वरचढ ठरला. फिफा विश्वचषकात नेमारचा हा सहावा गोल होता. नेमारने केवळ ३८ शॉर्ट्समध्ये ६ गोल झळकावले. मेसीला ६ गोल करण्यासाठी ६७ शॉर्ट्स मारावे लागले होते. तर रोनाल्डोने ७४ शॉर्ट्समध्ये ६ गोल डागले.

नेयमारने केलेला गोल हा ब्राझीलचा विश्वचषकातील २२७ वा गोल ठरला. त्यांनी जर्मनीला मागे टाकले आहे. जर्मनीचा संघ यापूर्वीच विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

दरम्यान, ब्राझीलने सुरूवातीपासूनच सामन्यावर आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना काही संधीही मिळाल्या. पण मेक्सिकोच्या संरक्षक फळीने त्यांचा डाव यशस्वी करू दिला नाही. हाफ टाईमपर्यंत ०-० असा गोलरहित होता. दुसऱ्या हाफमध्ये ब्राझीलने वेगवान सुरूवात केली आणि नेयमारने आपला करिष्मा दाखवला. त्याने ५१ व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलला १-०ने आघाडी मिळवून दिली.

शेवटच्या क्षणी २ मिनिटे आधी नेयमारने पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि फिर्मिनोकडे अचूक पास केला. फिर्मिनोने ही संधी दवडली नाही. त्याने अगदी लिलया गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मेक्सिकोचा संघ यापूर्वी १९८६च्या फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीत पोहोचला होता. यावेळीही पुढच्या फेरीत जाण्याचे मेक्सिकोचे स्वप्न भंगले.

मागील सात टुर्नामेंटमधून मेक्सिको संघ बादफेरीतून बाहेर पडला आहे. यापूर्वी ते १९९४, १९९८,२००२,२००६,२०१०,२०१४ आणि २०१८ असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2018 9:11 pm

Web Title: fifa world cup 2018 brazil vs mexico match live updates football score
Next Stories
1 FIFA World Cup 2018: BLOG : जया अंगी मेसीपणं
2 FIFA World Cup 2018: पेनल्टी शूटआऊटवर अकिनफिव्हचा बचाव आणि रशियाकडून इतिहासाची नोंद
3 FIFA World Cup 2018: पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाची डेन्मार्कवर ३- २ ने मात
Just Now!
X