News Flash

FIFA World Cup 2018 Video : स्त्रियांचा आदर राखायला शिक!; किस करायला आलेल्या चाहत्याला महिला रिपोर्टरने सुनावले

एका कोलंबियन महिला रिपोर्टरशी छेडछाडीची घटना ताजी असतानाच आता ब्राझिलियन महिला रिपोर्टरशीही अशाच प्रकारची घटना घडली आहे.

FIFA World Cup 2018 Video : रशियात सध्या फिफा वर्ल्डकप सुरु आहे. या स्पर्धेत साखळी फेरीतील बरेचसे सामने होऊन गेले असून अनेक विक्रम प्रस्थापित झाले आहेत. पण काही दिवसांपूर्वी एका घटनेमुळे या स्पर्धेला गालबोट लागले. एका कोलंबियन महिला रिपोर्टरशी लाईव्ह प्रक्षेपण सुरु असताना एका चाहत्याने अश्लील वर्तन करत तिचे चुंबन घेतले. नंतर मात्र त्याने हे कृत्य पैजेसाठी केले असल्याचे सांगत माफी मागितली.

ही घटना अगदी ताजी असतानाच अशाच प्रकारची अजून एक गोष्ट घडली आहे. सामन्याच्या ठिकाणी स्टेडियमबाहेर ब्राझिलियन महिला रिपोर्टर ज्युलिया गुमारेझ ही लाईव्ह वृत्तांकन करत असताना रिपोर्टिंग करत होती. त्या वेळेस अचानक एक चाहता त्या महिला रिपोर्टरचे चुंबन घेण्यासाठी तिच्याजवळ आला. त्या महिलेने शिताफीने त्याचा हा प्रयत्न चुकवला. लाईव्ह टीव्हीवर हा प्रयत्न चुकल्याचे समजल्याने हा चाहता ओशाळला आणि त्याने तेथून काढता पाय घेतला.

कोलंबियन महिलेसॊबत जेव्हा हा प्रकार घडला, तेव्हा त्या महिला रिपोर्टरने या प्रकारावर व्यक्त होणे टाळत आपले वृत्तांकन सुरु ठेवले होते. पण ब्राझिलियन महिला रिपोर्टरने मात्र त्या चाहत्याला चांगलेच सुनावले. ‘असं करू नकोस. पुन्हा कधीही असं करायचा प्रयत्नही करू नकोस. असं करायला तुला मी कधीच संमती देणार नाही. हे वर्तन अत्यंत चुकीचं आहे. महिलेशी असं वागू नकोस. महिलांचा आदर करायला शिक!”, अशा शब्दात तिने त्या चाहत्याची कानउघाडणी केली.

दरम्यान, तिने त्या चाहत्याचा अश्लीलतेकडे झुकणारा प्रयत्न हाणून पाडणारा आणि त्यानंतर त्याची कानउघाडणी केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्व जण त्या व्हिडिओवर व्यक्त होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2018 4:52 pm

Web Title: fifa world cup 2018 brazilian female reporter scold fan for kissing
टॅग : Fan,Football
Next Stories
1 FIFA World Cup 2018: फुकटचा प्याला! नेमारच्या पडण्यावर या बारची भन्नाट ऑफर
2 FIFA World Cup 2018: इराणला बरोबरीत रोखत पोर्तुगाल बादफेरीत
3 FIFA World Cup 2018 : कोलकात्याच्या चहावाल्याचे अनोखे मेसीप्रेम
Just Now!
X