News Flash

FIFA World Cup 2018 : ‘तुझ्यापेक्षा कॅन्सर बरा’; कोलंबियाचे चाहते खेळाडूंवर खवळले

FIFA World Cup 2018 : युरीबे आणि बाका या दोघांना पेनल्टी शूट आऊटमध्ये गोल करता आला नाही. त्यामुळे कोलंबियाच्या चाहत्यांनी त्यांचा समाचार घेतला.

फिफा विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीत कोलंबियाला पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने पेनल्टी शूट आऊटमध्ये त्यांना ४-३ असे पराभूत केले. या सामन्यात नियमित वेळेत केवळ १-१ गोल झाला होता. त्यामुळे सामना पेनल्टी शूट आऊटपर्यंत पोहोचला होता. या पेनल्टी शूट आऊटमध्ये कोलंबियाला ३ गोल करता आले. त्यांच्याकडून युरीबे आणि कार्लोस बाका या दोघांना गोल करता आला नाही. त्यामुळे कोलंबियाच्या चाहत्यांनी या दोघांचा सोशल मीडियावर जोरदार समाचार घेतला.

युरीबे आणि बाका यांच्यातही बाकाला न करता आलेला गोल हा गोलसाठी करण्यात आलेला सर्वात वाईट प्रयत्न होता, असे चाहत्यांचे म्हणणे पडले. त्यामुळे चाहत्यांनी बाकाला सर्वाधिक लक्ष्य केले. त्यात HumorFPCosky या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेले ट्विट सर्वात जास्त चर्चेत आले. ‘आय हेट यु, बाका! तू अतिशय वाईट खेळलास. तुझ्यापेक्षा कॅन्सर बरा. किमान त्याच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे जाण्याची सोय असते. पण तुझ्या खेळाला काहीच औषध नाही. आता तूच तुझा मार्ग शोध’, अशी विखारी टीका या ट्विटर हँडलवरून करण्यात आली आहे.

याशिवाय, अनेकांनी त्याच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले. तर काहींनी त्याला मायदेशी न परतण्याचा सल्ला दिला. एका चाहत्याने तर कोलंबियाच्या सर्व खेळाडूंचे आभार मानले. पण त्यातून बाकाला वगळले. बाका हा अत्यंत निरुपयोगी खेळाडू आहे. त्याने कोलंबियात परंतु नये, अशी टीका एका चाहत्याने केली.

काहींनी युरीबेलाही टीकेचे लक्ष्य केले. ‘तू अत्यंत दर्जाहीन खेळाडू आहेस असे म्हणत I hope you die अशी जहाल प्रतिक्रिया एका चाहत्याने व्यक्त केली. तर ‘हा तुझा शेवटचा सामना होता कारण तू खेळ आता संपलाय’, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2018 12:26 pm

Web Title: fifa world cup 2018 carlos bacca getting cursed by colombian fans on social media
टॅग : Social Media
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : आहे अनपेक्षित तरी..
2 FIFA World Cup 2018 : ‘टिकी-टाका’च्या निमित्ताने
3 FIFA World Cup 2018 : जपानचा होंडा निवृत्त
Just Now!
X