• आसन क्षमता : ४५ हजार
  • सामने : इजिप्त वि. उरुग्वे, फ्रान्स वि. पेरू, जपान वि. सेनेगल, मेक्सिको वि. स्वीडन

रशियातील जुन्या स्टेडियममधील हे बहुउद्देशीय स्टेडियम आहे. १९५३ ते १९५७ या कालावधीत त्याचे बांधकाम झाले आहे. या स्टेडियमवर अ‍ॅथलेटिक्सबरोबरच स्केटिंग स्पर्धाही आयोजित केल्या जातात. इसवी सन २००० मध्ये त्याच्या नूतनीकरणाची योजना आखण्यात आली. २००७ मध्ये त्याच्या नूतनीकरणास प्रारंभ झाला व २०११ मध्ये त्याचे नूतनीकरण पूर्ण झाले. रशियास विश्वचषक स्पर्धेचे संयोजनपद मिळाल्यानंतर २०१२ मध्ये या स्पर्धेचे चार सामने येथे घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या स्टेडियमचे नियमावलीत हे स्टेडियम बसत नसले, तरी या भागातील चाहत्यांचा आग्रह लक्षात घेऊन स्टेडियमवरचे सामने अन्यत्र हलविण्यास संयोजन समितीने नकार दिला. विश्वचषकासाठी रंगीत तालीम म्हणून येथे एक एप्रिल २०१८ रोजी उरल क्लब व रुबेल कझान यांच्यात प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता.