26 October 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया; सचिनचा ‘या’ संघाला पाठिंबा

FIFA World Cup 2018 : सचिनने आज होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात या संघाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

सचिन तेंडुलकर

FIFA World Cup 2018 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा कायम आपल्या क्रीडाप्रेमासाठी चर्चेत असतो. नुकतेच त्याने टेनिसपटू रॉजर फेडरर याचे टेनिस सामन्यातील क्रिकेट शॉट साठी कौतुक केले. त्यानंतर आता सचिनने आज होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात एका संघाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आज उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया असा सामना रंगणार आहे.

या स्पर्धेत इंग्लंडचा संघ हा ‘अंडरडॉग’ समजला जात होता. मात्र त्यांनी दमदार खेळ करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. या इंग्लंडच्या संघाला आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचाही पाठिंबा मिळाला आहे. सचिनने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

या व्हिडिओमध्ये ”यावेळी माझा पाठिंबा इंग्लडच्या संघाला आहे. कम ऑन इंग्लंड!” असा संदेश देत इंग्लडच्या संघाला चिअर करताना सचिन दिसत आहे. या व्हिडिओत सचिनने आपल्यातील फुटबॉलरचे गुणदेखील दाखवले आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 11:21 am

Web Title: fifa world cup 2018 england croatia sachin supports england
टॅग Croatia,England,Support
Next Stories
1 FIFA World Cup 2018: फ्रान्स अंतिम सामन्यांत पोहोचल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस
2 FIFA World Cup 2018 : वीस वर्षांत सर्वाधिक वेळा फायनलमध्ये पोहोचणारा फ्रान्स ठरला पहिलाच देश
3 FIFA World Cup 2018 : लॅटिन अमेरिकेचे आशास्थान उरुग्वे!
Just Now!
X