26 February 2020

News Flash

Fifa world cup 2018 : फिफा विश्वचषक ठरला तीन देशातल्या मित्रांच्या भेटीचा दुवा

Fifa world cup 2018 : अनुराग भिडे, संकेशा, सुयश दुसाद आणि उदित मंगल हे चार मित्र वेगवेगळ्या देशात वास्तव्यास आहेत.

Fifa world cup 2018 : रशियामध्ये सुरु झालेला फुटबॉल विश्वचषक हा निरनिराळ्या कारणांसाठी महत्वाचा ठरत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंसाठी हा प्रतिष्ठेचा वर्ल्डकप आहे, तर काहींचा हा पहिलाच वर्ल्डकप असल्याने त्यांच्यासाठी हा वल्र्डकप खास आहे. काही खेळाडूंना या वर्ल्डकपच्या माध्यमातून आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे, तर काहींना आपल्या कारकिर्दीचा शेवट गोड करायचा आहे. खेळाडूंसाठी हा वर्ल्डकप खेळणे स्वप्नवत आहेच, पण त्याबरोबरच काही भारतीयांसाठी देखील Fifa world cup 2018 स्वप्नपूर्तीचे कारण ठरला आहे.

चार वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये होणाऱ्या Fifa world cupआधी मुंबईतील आयआयटीच्या सात विद्यार्थ्यांनी हा विश्वचषक पाहण्यासाठी एकत्र ब्राझीलला जाण्याचे स्वप्न पहिले होते. पण २०१३ साली हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि आपल्या पहिल्यावहिल्या नोकरीसाठी ठिकठिकाणी निघून गेले. त्यानंतर पुरेसे पैसे नसल्याने हे सात मित्र ब्राझीलच्या Fifa world cupसाठी जाऊ शकले नाहीत. पण त्यांनी कॉलेजमध्ये पाहिलेलं हे स्वप्न सोडून न देता ते थोडेसे पुढे ढकलले आणि अखेर रशियात होणाऱ्या Fifa world cup २०१८मध्ये त्यापैकी काही जणांनी हे स्वप्न पूर्ण करण्यास सुरुवात केली.

रशियामध्ये होत असलेल्या Fifa world cup 2018मध्ये एकूण सात मित्रांपैकी ४ मित्रांनी त्यांचे हे स्वप्न जगण्यास सुरुवात केली. हे चारही जण Fifa world cup 2018मधील पोर्तुगाल विरुद्ध स्पेन हा बहुचर्चित सामना पाहण्यासाठी सोची येथे पोहोचले. त्यांनी Fifa world cup 2018 मधील त्यांचा पहिला सामना पाहिला आणि ते पुढील सामन्यांसाठी तिथून मॉस्कोला गेले आहेत.

या चार मित्रांमध्ये खास गोष्ट म्हणजे, हे चारही मित्र वेगवेगळ्या देशात वास्तव्यास असूनही ते हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र भेटले आहेत. या चौघांपैकी अनुराग भिडे हा मुंबईमध्ये राहत आहे. तर संकेशा आणि सुयश दुसाद हे दोन मित्र विवाहबंधनात अडकले असून हे जोडपे सिंगापूरमध्ये वास्तव्यास आहे. तर उदित मंगल हा जर्मनीत आहे. मात्र, असे असले तरीही हे चौघे आता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी रशियात आहेत.

First Published on June 16, 2018 4:01 pm

Web Title: fifa world cup 2018 four mumbai iit met in russia
टॅग Fifa,Football
Next Stories
1 FIFA World Cup 2018: …म्हणून रोनाल्डो मेसीपेक्षा सरस!
2 Fifa World Cup 2018 RUS vs RSA : पराभव जिव्हारी; सौदी अरेबियाच्या काही खेळाडूंना दणका!
3 FIFA World Cup 2018 : हरभजनचे ‘मेसी’प्रेम
Just Now!
X