News Flash

FIFA World Cup 2018 : फ्रान्सला दिमाखात बाद फेरी गाठण्याची संधी

दिदिएर डेश्चॅम्पसच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला. या

पेरूला हरवून आपली दावेदारी मजबूत करण्याची संधी फ्रान्सला मिळणार आहे.

येकाटेरिनबर्ग : विश्वविजेतेपदाचे दावेदार मानले जाणारे अन्य देश विश्वचषकाचा अपेक्षित प्रारंभ करण्यात अपयशी ठरले असताना फ्रान्सने मात्र दिमाखात सलामी नोंदवली. आता गुरुवारी पेरूविरुद्ध दुसऱ्या विजयासह उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा  त्यांचा निर्धार आहे.

दिदिएर डेश्चॅम्पसच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवला. या सामन्यात व्हिडीओ साहाय्यक सामनाधिकारी (व्हीएआर) तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे फ्रान्सला पेनल्टी बहाल करण्यात आली. अ‍ॅन्टोनी ग्रीझमनने त्याद्वारे गोल करीत फ्रान्सचे खाते उघडले. मग सामना संपायला १० मिनिटे असताना अझीझ बेहिचच्या स्वयंगोलमुळे फ्रान्सचा विजयाचा मार्ग सुकर झाला. फ्रान्सच्या आघाडीच्या फळीची मदार ग्रीझमन, किलियान एमबाप्पे आणि ऑस्माने डेम्बेले यांच्यावर असेल.

जर्मनीने सलामीच्या लढतीत मेक्सिकोकडून हार पत्करली. तसेच स्पेन, अर्जेटिना, ब्राझील ला पहिल्या लढतीमध्ये बरोबरीत रोखले गेले. या पाश्र्वभूमीवर पेरूला हरवून आपली दावेदारी मजबूत करण्याची संधी फ्रान्सला मिळणार आहे.

सामना क्र. २२

गट    क

फ्रान्स वि. पेरू

स्थळ : सेंट्रल स्टेडियम

वेळ : रात्री ८:३० वा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 1:04 am

Web Title: fifa world cup 2018 france vs peru world cup 2018 match preview
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : ऑस्ट्रेलियाच्या मार्गात एरिक्सनचा अडथळा
2 FIFA World Cup 2018 :  ‘व्हीएआर’चा भूलभुलैया
3 FIFA World Cup 2018 : तो ‘नाद’ खुळावणारा!
Just Now!
X