FIFA World Cup 2018 Iran vs Spain: फुटबॉल वर्ल्डकपमध्ये बुधवारी बलाढ्य स्पेनने इराणवर १- ० ने मात केली. अथक संघर्षानंतर स्पेनला हा विजय मिळाला असून स्पेनच्यावतीने झालेला एकमेव गोल डिएगो कोस्टाने मारला. डिएगो कोस्टाचा वर्ल्ड कपमधील दुसऱ्या मॅचमध्ये हा तिसरा गोल आहे. या विजयासह स्पेनने ब गटात अव्वलस्थानी झेप घेतली. स्पेनचा पहिला सामना बरोबरीत सुटला होता. तर इराणविरुद्ध स्पेनला विजय मिळाल्याने त्यांच्या खात्यात एकूण ४ गूण जमा आहेत.

बुधवारी वर्ल्डकपमध्ये स्पेन आणि इराण यांच्यात सामना पार पडला. पोर्तुगालसमवेतचा सामना बरोबरीत सुटल्याने स्पेनसाठी इराणविरुद्धचा सामना महत्त्वाचा होता. तर दुसरीकडे इराणने पहिल्या सामन्यात मोरोक्कोवर मात केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

कझान स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात इराणने स्पेनला चांगली टक्कर दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल मारता आला नाही. विशेषत: स्पेनच्या खेळाडूंना रोखण्यात इराणच्या बचाव फळीला यश आले.  दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने आक्रमक खेळ केला आणि यात त्यांना यशही आले. ५४ व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने गोल मारुन संघाला १- ० अशी आघाडी मिळवून दिली. इराणची बचाव फळी आणि गोलकिपरने स्पेनला चांगलेच झुंजवले.

इराणनेही एक गोल मारला खरा, मात्र ऑफसाइडमुळे तो गोल पात्र ठरला नाही. यामुळे इराणच्या खेळाडू आणि चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. अखेर स्पेनने या सामन्यात १- ० ने बाजी मारली. या विजयामुळे गुणतालिकेत ब गटात स्पेन ४ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे.  स्पेनच्या डिएगो कोस्टाचा वर्ल्डकपमधील हा तिसरा गोल असून