11 August 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : शर्यत गटातील अव्वल स्थानासाठी

सामन्यात दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस अनुभवायला मिळणार आहे.

जपानचे खेळाडू सराव करताना

आव्हानात्मक सेनेगलशी आज जपानचा सामना; ओसाको विरुद्ध मॅने यांच्यात टक्कर

इकाटेरिंबर्ग : रशियात सुरू असलेल्या विश्वचषकात आशिया खंडाचे नाव उंचावणारी कामगिरी सध्या जपानचा फुटबॉल संघ करत आहे. पहिल्याच सामन्यात कोलंबियासारख्या बलाढय़ संघाला त्यांनी २-१ असे नमवले. त्याशिवाय सामना संपल्यानंतर जपानच्या चाहत्यांनी स्टेडियममधील कचरा गोळा करून संस्कृतीचे दर्शन केले. या सर्व सकारात्मक बाबींच्या पाश्र्वभूमीवर रविवारी जपान ‘ह’ गटातून सर्वात प्रथम उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी सेनेगलशी दोन हात करणार आहे. धक्कादायक कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेनेगलला पराभूत करणे सोपे नाही, हे जपानला ठाउक आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस अनुभवायला मिळणार आहे.

कोलंबियावर मिळवलेल्या विजयानंतर जपानचा आत्मविश्वास बळावलेला आहे. त्यांचे शिंजी कागवा आणि युया ओसाको फॉर्मात असून बचावफळीची सुरेख साथ त्यांना लाभत आहे. फिफाच्या जागतिक क्रमवारीत ६१व्या स्थानी असणाऱ्या जपानने २०१०च्या विश्वचषकात बाद फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे यंदा पुन्हा आठ वर्षांनंतर ते अशी कामगिरी करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

दुसरीकडे २००२ मध्ये आपल्या पहिल्याच विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या सेनेगलची प्रमुख मदार सॅडिओ मॅने, एमबॅये निआंग यांच्यावर आहे. भक्कम बचाव आणि धारदार आक्रमणाच्या जोरावर त्यांनी पोलंडला धूळ चारली होती. त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा त्याच कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे.

तुम्हाला हे माहीत आहे?

सेनेगलने आतापर्यंत एकही साखळी फेरीतील सामना गमावलेला नाही. २००२च्या विश्वचषकातील तीन व यंदाच्या विश्वचषकातील एक असे चारही सामने त्यांनी जिंकलेले आहेत. फक्त जर्मनी आणि वेल्स या संघांनी आतापर्यंत सलग चार साखळी सामने जिंकलेले आहेत.

सामना क्र. ३१

गट  ह

जपान वि. सेनेगल

स्थळ : इकाटेरिंबर्ग एरिना

वेळ : रात्री ८:३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, सोनी टेन ३, सोनी ईएसपीएन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 3:56 am

Web Title: fifa world cup 2018 japan vs senegal match preview
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : आव्हान टिकवण्यासाठी पोलंड-कोलंबियात चुरस
2 FIFA World Cup 2018 : इंग्लंडचे लक्ष्य बाद फेरी!
3 FIFA World Cup 2018 : ऑफ साइड : ही चाल ध्येयपूर्तीकडे
Just Now!
X