फ्रान्सविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवानंतर अर्जेटिनाचा वलयांकित खेळाडू लिओनेल मेसी हा आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्राला रामराम करण्याची शक्यता आहे, अशीच चर्चा येथे सुरू आहे. मेसीला येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील चार सामन्यांमध्ये केवळ चारच गोल नोंदवता आले. त्याने नायजेरियाविरुद्ध केलेल्या गोलमुळेच अर्जेटिनाची साखळी गटातून बाद होण्याची नामुष्की टळली होती. तसेच त्याने दोन वेळा आपल्या सहकाऱ्यांना गोल करण्यास मदत केली होती, तरीही या क्षेत्रातील त्याची प्रतिष्ठा लक्षात घेता ही कामगिरी त्याच्यासारख्या महान खेळाडूला साजेशी नव्हती, अशीच चर्चा ऐकावयास मिळत आहे.