09 December 2019

News Flash

FIFA World Cup 2018 : सामना जिंकल्यानंतर मॅरोडोनाचं ‘स्वॅग सेलिब्रेशन’…

दिएगो मॅराडोनाने या गोलनंतर जोरदार सेलिब्रेशन केले आणि टीकाकारांना उत्तर म्हणून वादग्रस्त इशारे केले.

FIFA World Cup 2018 : अर्जेंटिना-नायजेरिया सामना सुरु झाल्यानंतर अर्जेंटिनाच्या तमाम चाहत्यांच्या मनावर प्रचंड तणाव होता. मात्र अर्जेंटिनाने सामन्यात निर्णायक क्षणी गोल करत सामना जिंकला. ‘करो या मरो’च्या लढतीत अर्जेंटिनाचा कर्णधार मेसीने सामन्याच्या १४ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पूर्वार्धात अर्जेंटिना १-० ने आघाडीवर होती. पण उत्तरार्धात नायजेरियाच्या व्हिक्टर मोसेने ५१व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत १-१ अशी बरोबर साधून दिली.

सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असेपर्यंत हा सामना बरोबरीत सुटणार असे वाटत होते. मात्र निर्णायक क्षणी मार्कोस रोजोने ८७व्या मिनिटाला जबरदस्त गोल करत अर्जेंटिनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत अर्जेंटिनाने बाद फेरीत धडक मारली.

८७व्या मिनिटाला रोजोने मारलेला गोल हा अर्जेंटिनासाठी बाद फेरीचे तिकीट मिळवून देणारा ठरणार हे जवळपास निश्चित होते. दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमयध्ये उपस्थित होता. त्यामुळे दिएगो मॅराडोनाने या गोलनंतर जोरदार सेलिब्रेशन केले आणि टीकाकारांना उत्तर म्हणून वादग्रस्त इशारे केले.

गोल झाल्यानंतर बाजूला असलेल्या सहकाऱ्याला मॅराडोनाने मिठी मारली. आणि त्यानंतर लगेचच दोन्ही हातांची मधली बोटे दाखवत टीकाकारांना चोख उत्तर दिले.

दरम्यान, या सामन्यानंतर मॅराडोनाला स्टेडियम बाहेर जाण्यासाठी मॅराडोनाला आधाराची गरज लागली. सामन्यानंतर सहाय्यकांच्या मदतीने लक्झरी बॉक्समध्ये त्याला नेण्यात आले. तिथे त्याच्यावर वैद्यकीय सहाय्यकांनी प्राथमिक उपचार केले.

First Published on June 27, 2018 4:07 pm

Web Title: fifa world cup 2018 match won by argentina maradona shows middle finger
Just Now!
X