News Flash

FIFA World Cup 2018: जर्मनी विरुद्ध ३५ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे मेक्सिकोमध्ये झाला भूकंप

जर्मनी आणि मेक्सिकोमध्ये रविवारी सामन्याला सुरुवात झाली तेव्हा जर्मनीचा संघ विजयासाठी फेव्हरेट होता. मेक्सिको जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते.

जर्मनी आणि मेक्सिकोमध्ये रविवारी सामन्याला सुरुवात झाली तेव्हा जर्मनीचा संघ विजयासाठी फेव्हरेट होता. मेक्सिको जिंकेल असे कोणालाही वाटले नव्हते. पण उत्तर अमेरिकेतील या संघाने यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपमधील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद केली आणि मेक्सिकोमध्ये कृत्रिम भूकंप आला.

छोटयाशा मेक्सिकोने बलाढय जर्मनीवर विजय मिळवल्यानंतर मेक्सिकोमध्ये इतके जोरदार सेलिब्रेशन झाले कि, त्यामुळे भूकंप मापक यंत्रावर कृत्रिम भूकंपाची नोंद झाली आहे. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला जेवियर हेर्नाडेझच्या पासवर २२ वर्षाच्या हरविंग लोझानोने गोल करत मेक्सिकोला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मेक्सिकोने ही आघाडी शेवटपर्यंत कायम टिकवून गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का दिला.

जर्मनीवरील विजयानंतर मेक्सिकोमध्ये असे काही जोरदार सेलिब्रेशन झाले कि, त्यामुळे कृत्रिम भूकंप झाला. मेक्सिकोमध्ये भूकंपाची नोंद आणि विश्लेषण करणाऱ्या एसआयएमएमएसए या यंत्रणेने ही माहिती दिली आहे. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला हरविंग लोझानोने गोल केल्यानंतर मेक्सिको शहरात भूकंपाची नोंद झाल्याचे टि्वट एसआयएमएमएसएने केले आहे.

मेक्सिको शहरात भूकंपाची नोंद झाली असून हा कृत्रिम भूकंप आहे असे एसआयएमएमएसएने म्हटले आहे. मेक्सिकोच्या संघाने जर्मनीवर गोल केल्यानंतर आनंदाच्या भरात एकाचवेळी भरपूर लोकांनी उडया मारल्यामुळे भूकंप मापक यंत्रात या कृत्रिम भूकंपाची नोंद झाली आहे. हरविंग लोझानोने हा मेक्सिकोच्या फुटबॉल इतिहासातील मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2018 8:35 am

Web Title: fifa world cup 2018 mexico vs germany earthquake hirvinglozano
Next Stories
1 FIFA World Cup 2018: ४० वर्षात पहिल्यांदाच ब्राझीलला नाही जिंकता आला वर्ल्डकपचा पहिला सामना
2 FIFA World Cup 2018 : भावूक पोग्बाची वडिलांना श्रद्धांजली
3 FIFA World Cup 2018 : आयसिसच्या नव्या व्हिडीओने खळबळ
Just Now!
X