20 September 2019

News Flash

FIFA World Cup 2018 POL vs SEN : वर्ल्डकपमध्ये ‘धक्कातंत्र’ सुरूच; कोलंबियापाठोपाठ पोलंडवर पराभवाची नामुष्की

FIFA World Cup 2018 POL vs SEN : सेनेगलकडून पोलंडचा २-१ने पराभव

FIFA World Cup 2018 POL vs SEN : फिफा विश्वचषक स्पर्धेत आजचा दिवस हा बलाढ्य संघांना धक्का देणारा ठरला. पहिल्या सामन्यात बलाढ्य कोलंबियाला जपानने पराभूत केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात क्रमवारीतील ८व्या स्थानी असलेल्या पोलंडवर पराभवाची नामुष्की ओढवली. २७व्या स्थानी असलेल्या सेनेगलने पोलंडला २-१ असे पराभूत केले.

या सामन्यावर पहिल्यापासूनच सेनेगलचे वर्चस्व पाहायला मिळाले. पूर्वार्धात ३७व्या मिनिटाला सिओनेकने स्वयंगोल करत सेनेगलला आघाडी मिळवून दिली. त्यांनतर उत्तरार्धात ६०व्या मिनिटाला नियंगने गोल करत सेनेगलची आघाडी वाढवली. ८५व्या क्रायचोवीकने १ गोल करत पोलंडला पराभवाच्या छायेतून काढायचा प्रयत्न केला. पण त्यांनतर एकही गोल न झाल्याने सामना सेनेगलने जिंकला.

या विजयाबरोबर या स्पर्धेत विजय मिळवणारा सेनेगल हा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. सेनेगलच्या विजयामुळे एच गटातील क्रमवारी अत्यंत चुरशीची झाली असून जपान या गटात अव्वल आहे. सेनेगल दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर बलाढ्य समजला जाणारा पोलंड तिसऱ्या आणि कोलंबिया चौथ्या स्थानी फेकली गेला आहे.

First Published on June 19, 2018 10:49 pm

Web Title: fifa world cup 2018 pol vs sen senegal beat poland 2 1
टॅग Fifa,Football