15 August 2020

News Flash

FIFA World Cup 2018: बलाढ्य अर्जेंटिनावर बरोबरीची नामुष्की, मेसीची हुकलेली पेनल्टी आईसलँडच्या पथ्यावर

आईसलँडचा गोलकिपर हल्डरसनचा अभेद्य बचाव

मेसीची पेनल्टी किक आईसलँडचा गोलकिपर हल्डरसनने यशस्वीपणे वाचवली

फिफा विश्वचषकात बलाढ्य संघ मानल्या जाणाऱ्या अर्जेंटिनाला आपल्या पहिल्याच सामन्यात बरोबरीवर समाधान मानावं लागलं आहे. विश्वचषकाचा पहिला सामना खेळणाऱ्या आईसलँडने दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या अर्जेंटिनाला १-१ अशा बरोबरीत रोखलं. अप्रतिम बचावाचं प्रदर्शन करत आईसलँडने अर्जेंटिनाच्या आक्रमण फळीचे सर्व हल्ले परतवून लावले. या सामन्यात लिओनेल मेसीने हुकवलेली पेनल्टी किक आईसलँडच्या चांगल्याच पथ्यावर पडली आहे.

आईसलँडचा गोलकिपर हल्डरसन हा आजच्या सामन्याचा खरा हिरो ठरला. अर्जेंटिनाच्या मेसी, अॅग्वेरो यांसारख्या खेळाडूंची आक्रमण हल्डरसनने मोठ्या शिताफीने रोखली. सामन्याच्या सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतलेल्या अर्जेंटिनाने १९ व्या मिनीटाला गोल केल्या. सर्जिओ अॅग्वेरोने हल्डरसनचा चकवत आपल्या संघाचा पहिला गोल केला. मात्र पुढच्या काही मिनीटांमध्येच आईसलँडने सामन्यात बरोबरी साधली.

सामन्यात २३ व्या मिनीटाला फिनबॉग्सनने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत आईसलँडला सामन्यात बरोबरी साधून दिली. यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे गोल करण्याचे प्रत्येक प्रयत्न आईसलँडच्या खेळाडूंनी हाणून पाडले. मेसीने आजच्या सामन्यात ११ वेळा गोलपोस्टवर आक्रमण केलं. मात्र त्याची एकही किक गोलमध्ये रुपांतरीत होऊ शकली नाही. पहिल्याच सामन्यात बरोबरी साधल्यामुळे आता पुढील सामन्यात विजय मिळवणं अर्जेंटिनासाठी अनिवार्य बनलं आहे. तर दुसरीकडे विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळणाऱ्या आईसलँडचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 8:45 pm

Web Title: fifa world cup 2018 russia iceland equalize with mighty argentina messi miss golden opportunity on penalty kick
Next Stories
1 Fifa World Cup 2018 FRA vs AUS : पॉग्बाचा गोल ठरला फ्रान्ससाठी निर्णायक; ऑस्ट्रेलियावर २-१ने मात
2 Fifa world cup 2018 Prediction : अचूक अंदाज वर्तवणाऱ्या डुकराने उपांत्य फेरीसाठी निवडले ‘हे’ ४ संघ
3 Fifa world cup 2018 : फिफा विश्वचषक ठरला तीन देशातल्या मित्रांच्या भेटीचा दुवा
Just Now!
X