News Flash

FIFA World Cup 2018: जपानचा हीरो ‘होंडा’

केईसुके होंडाच्या गोलमुळे जपानची सेनेगलविरुद्ध बरोबरी

FIFA World Cup 2018: जपानचा हीरो ‘होंडा’
जपानकडून सामन्यात दुसरा गोल करणारा होंडा

केईसुके होंडाच्या गोलच्या जोरावर जपानने सेनेगलला २-२ असं बरोबरीत रोखलं, त्यामुळं फिफा विश्वचषकाच्या ग्रुप ‘एच’ची लढाई आता आणखी रंगतदार झालीय. या सामन्यात सादियो मानेनं ११ व्या मिनिटाला गोल करुन सेनेगलचं खातं उघडलं होतं. पण तकाशी इनुईने ३४ व्या मिनिटाला गोल डागून जपानला बरोबरी साधून दिली. यानंतर दोन्ही संघांनी सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये त्यांना यश आलं नाही. यानंतर मोला वाघूने ७१ व्या मिनीटाला गोल करुन सेनेगलला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

यावेळी एका गोलने पिछाडीवर पडललेल्या जपानने, केईसुके होंडा या खेळाडूला मैदानात उतरवलं. होंडा मैदानात उतरला काय आणि सामन्याचं चित्रंच पालटलं. कारण तकाशी इनुईच्या पासवर होंडाने ७८ व्या मिनिटाला गोल झळकावून जपानला २-२ अशी बरोबरी साधून दिली. केईसुके होंडा हा फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला. होंडाच्या खात्यात ९ सामन्यांत ४ गोल जमा झालेयत. दरम्यात या सामन्यानंतर सेनेगल आणि जपानच्या खात्यात प्रत्येकी ४-४ गुण जमा झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 10:40 pm

Web Title: fifa world cup 2018 russia japan equalize with senegal 2 2
Next Stories
1 FIFA World Cup 2018: पनामाचा ६-१ ने धुव्वा उडवत इंग्लंडची बाद फेरीत धडक
2 Happy Birthday Messi: चाहत्यांनी तयार केलेला हा अनोखा केक पाहिलात का?
3 FIFA World Cup 2018 – टोनी क्रुसच्या गोलने माजी विजेत्या जर्मनीला तारलं, स्वीडनवर २-१ ने मात
Just Now!
X