यजमान रशियाने फिफा वर्ल्ड कप- २०१८ च्या सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियाचा ५-० ने दणदणीत पराभव केला. रशियाच्या युरी गाजिंस्कीने यंदाच्या विश्वचषकातील पहिला गोल करण्याचा मान मिळवला. या गोलच्या साहाय्याने त्याने रशियाला सौदी अरेबियाविरोधात १-० ने आघाडी मिळवून दिली.