News Flash

FIFA World Cup 2018 : पत्नीच्या रोनाल्डोप्रेमामुळे पतीने दिला घटस्फोट…

रोनाल्डोची चाहती असलेल्या ल्यूडमीला हिला त्याने रोनाल्डोबद्दल आणि तेथील क्लब फुटबॉलबद्दल खूप काही सुनावले आणि तो घर सोडून निघून गेला.

FIFA World Cup 2018 : फुटबॉल म्हंटले की सर्वाधिक चर्चेत असलेली नावं असतात ती अर्जेंटिनाचा लायनल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो… फिफा विश्वचषक स्पर्धेत या दोघांनी तितकी कमाल दाखवली नाही. पण तरीही या दोघांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. या दोघांच्या चाहत्यांमध्ये कायम कोण श्रेष्ठ? हा वाद प्रत्येक फुटबॉल ग्राउंडवर पाहायला मिळतो. सोशल मीडियावर तर या दोन खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये जोरदार जुंपलेली पाहायला मिळते. पण या वादामुळे चक्क एका पतीने आपल्या पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याची घटना घडली आहे.

एका रशियन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तेथील एका जोडप्यात मेसी आणि रोनाल्डो यांच्यात असलेल्या श्रेष्ठत्वाच्या वादामुळे घटस्फोट होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे वृत्त प्रथम मॉस्को येथील स्थानिक वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. आर्सेन आणि ल्यूडमीला या दोघांमध्ये मेसी आणि रोनाल्डो यांच्याबाबत वाद होत असत. यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान देखील या दोघांमध्ये अशाच प्रकारचे वाद झाले. या वादातून पती आर्सेन याने पत्नी ल्यूडमीला हिला घटस्फोटाची नोटीस पाठवली असे सांगण्यात येत आहे.

अर्जेंटिना आणि आइसलँड या दोन संघांमध्ये साखळी फेरीच्या गटातील पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यात मेसीला पेनल्टी किकची संधी मिळाली होती. मात्र त्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्याला अपयश आले. या मुद्द्यावरून पत्नी ल्यूडमीला हिने आर्सेनची थट्टा केली. मेसीला नवोदित संघाविरुद्ध साधा गोलदेखील मिळवता आला नाही. पेनल्टीसारख्या क्षणीही मेसीला अपयश आले, असे ल्यूडमीला हिने आर्सेनला हिणवले.

ही थट्टा – मस्करी मेसीचा चाहता असलेल्या आर्सेनच्या जिव्हारी लागली. रोनाल्डोची चाहती असलेल्या ल्यूडमीला हिला रोनाल्डोबद्दल आणि तेथील क्लब फुटबॉलबद्दल आर्सेन नको नको ते बोलला आणि आपला राग व्यक्त केला. त्यानंतर आर्सेन आपले सामान घेऊन घर सोडून निघून गेला आणि त्याने आपल्या पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवली, असे आर्सेनने स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या माहिती सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 7:59 pm

Web Title: fifa world cup 2018 russian couple divorced over ronaldo messi argument
टॅग : Argument,Ronaldo
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : मेसी-रोनाल्डो तुम्हाला आम्ही ‘GOAT’ (Greatest of All Time) का मानायचं?
2 FIFA World Cup 2018 : अखेर इंग्लंडची त्या शापातून मुक्तता
3 FIFA World Cup 2018 : सामन्याआधी वडिलांचं मायदेशात अपहरण, तरीही संघाचा विचार करुन ‘तो’ मैदानात उतरला
Just Now!
X