व्होल्गोग्रॅड : इजिप्त, मारोक्को आणि सौदी अरेबिया यांच्याकडे विश्वविजेतेपदाचे दावेदार म्हणून कुणीच अपेक्षा केली नव्हती. अपेक्षेप्रमाणेच या तिन्ही संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे इजिप्त आणि सौदी अरेबिया यांच्यातील अ-गटातील लढतीकडे केवळ शेवट गोड करण्याच्या इराद्याने हे संघ पाहतील.

सौदी अरेबियाने विश्वचषक स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. रशिया आणि उरुग्वेकडून त्यांनी हार पत्करली आहे. या दोन सामन्यांत एकंदर सहा गोल त्यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आले आहेत. मात्र सौदीला एकसुद्धा गोल नोंदवता आलेला नाही. दुसरीकडे इजिप्तनेही आपले दोन्ही सामने गमावले आहेत. मात्र त्यांच्या खात्यावर किमान एकमेव गोल तरी जमा आहे. मोहम्मद सलाहकडून इजिप्तला मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र तो अपयशी ठरला.

तुम्हाला हे माहीत आहे?

सौदी अरेबिया आणि इजिप्त यांच्यात विश्वचषकातील हा पहिला सामना आहे. १९९९च्या कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेत या दोघांमध्ये झालेल्या अखेरच्या लढतीत सौदीने ५-१ असा विजय मिळवला होता.

सामना क्र. ३४

गट  अ

सौदी अरेबिया वि. इजिप्त

स्थळ : व्होल्गोग्राड स्टेडियम

वेळ : सायं. ७.३० वा.