सौदी अरेबियाच्या संघामागे लागलेलं शुक्लकाष्ट काही केल्या कमी होण्याचं चिन्ह नाहीये. सलामीच्या सामन्यात यजमान रशियाविरुद्ध ५-० अशी हार पत्करावी लागल्यानंतर, फिफा विश्वचषकातलं सौदी अरेबियाचं आव्हान आता डळमळीत झालं आहे. त्यातचं सौदी अरेबियाच्या खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या पंखाला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाने टेकऑफ केल्यानंतर हा प्रकार घडला, त्यामुळे काही क्षणासाठी सर्वजण धास्तावले होते. मात्र काही वेळानंतर विमानाचं सुखरुप लँडींग करुन सर्व खेळाडूंना बाहेर काढण्यात आलेलं आहे. सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. VIDEO: Flight carrying the Saudi Arabia national football team suffers 'technical incident' on approach to Rostov-on-Don as the team flew in for their next #WorldCup fixture on Wednesday. No injuries reported. Aircraft believed to be Rossiya Airbus A319. | Video credit TBA. pic.twitter.com/wb5rpQ1DQR— Airport Webcams (@AirportWebcams) June 18, 2018 या अपघातानंतर सौदी अरेबिया फुटबॉल फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार, उरुग्वेविरुद्ध सामन्याआधी हा प्रकार घडला आहे. सर्व खेळाडूंना या अपघातानंतर सुरक्षितरित्या रोस्तोव ऑन डॉन या ठिकाणी आणण्यात आलं. | Press ReleaseAccording to the Saudi Arabian Football Federation, all the Saudi national team players have arrived safely in Rostov-on-Don this afternoon to play against Uruguay, and currently are staying in their residence, and that the fire was merely an accident. pic.twitter.com/ai67skC1Kp— Saudi National Team (@SaudiNT_EN) June 18, 2018 काही प्रसारमाध्यमांनी हा प्रकार पक्ष्याची विमानाच्या पंखाला धडक लागल्यामुळे झाल्याचं म्हटलंय. मात्र चौकशीअंती हा प्रकार तांत्रिक अडचणींमुळेच झाल्याचं समोर आलं आहे. | Pictures#KSA #Worldcup #URUKSA pic.twitter.com/vufua4Yjxf— Saudi National Team (@SaudiNT_EN) June 18, 2018