15 January 2021

News Flash

FIFA World Cup 2018 : मेक्सिको विजयी लय कायम राखणार?

गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का देणाऱ्या मेक्सिकोच्या संघाचा आत्मविश्वास अत्युच्च शिखरावर आहे.

हिरविंग  लोझानो

रोस्तोव्ह एरिना : गतविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का देणाऱ्या मेक्सिकोच्या संघाचा आत्मविश्वास अत्युच्च शिखरावर आहे. त्यामुळे दक्षिण कोरियासारख्या नामवंत खेळाडूंचा समावेश नसलेल्या संघालादेखील पराभूत करून बाद फेरी गाठण्याचा मेक्सिकोचा प्रयास राहणार आहे. मात्र, ही विजयी लय कायम राखण्यात ते यशस्वी होतात की कोरियाचा संघ त्यापासून त्यांना रोखतो ते पाहणे रंजक ठरणार आहे.

विश्वचषकातील पहिला सामना स्वीडनकडून पराभूत झालेल्या दक्षिण कोरियाच्या संघाला हा सामना जिंकणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच याच ध्येयाने त्यांचा संघ मैदानात उतरणार आहे. कोरियाची मदार त्यांच्या सोन हेउंगमिन आणि कि सुंगयुंग यांच्यावर राहणार आहे. मात्र, उर्वरित संघ कागदावर तरी तितकासा प्रभावी दिसत नाही. त्याउलट मेक्सिकोचा संघ पूर्ण बहरात खेळत असून जगातल्या कोणत्याही संघाला आपण पराभूत करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्या संघामध्ये दिसून येतो. जर्मनीविरुद्ध विजयी गोल नोंदवणारा हिरविंग लोझानो तर पुन्हा एकदा गोल करून संघाच्या विजयात योगदान देण्यास उत्सुक आहे. जर तो हा करिश्मा करू शकला तर विश्वचषकातील सलग दोन सामन्यांमध्ये गोल करणारा मेक्सिकोचा एकमेव खेळाडू ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 3:12 am

Web Title: fifa world cup 2018 south korea vs mexico world cup match preview
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : बेल्जियमसमोर टय़ुनिशियाचे आव्हान
2 FIFA World Cup 2018 Serbia vs Switzerland: स्वित्झर्लंडची सर्बियावर २- १ ने मात
3 FIFA World Cup 2018 : अर्जेंटिनाच्या पराभवानंतर केरळमधील मुलगा बेपत्ता; पोलिसांना सापडली सुसाईड नोट
Just Now!
X