FIFA World Cup 2018. फिफा विश्वचषकाचेच वारे सध्या सर्वत्र वाहू लागलेले असताना त्यादरम्यानच काही वादही सर्वांसमोर येत आहेत. सध्या फुटबॉलच्या या महाकुंभात चर्चा सुरु आहे, स्पेनच्या संघातील गोलकिपरची. स्पॅनिश गोलकिपर डेव्हिड डी गिआ याने देशाच्या पंतप्रधांनांनी आपली जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यावरुनच या विषयाला वाचा फुटली होती.

डेव्हिड दोन वर्षांपूर्वी लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. यासंबंधी आपलं बोलताना २०१६ मध्ये यरोपियन चँपियनशिपदरम्यान, तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे पंतप्रधान पेड्रो यांनी अशा खेळाडूचं यश हे माझ्यासाठी आणि देशासाठी प्रश्नचिन्हं उपस्थित करणारं आहे, अशा शब्दांत त्याच्यावर टीका केली होती. त्यांच्या या जाहीर वक्तव्यानंतर स्पेनमध्येही बऱ्याच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. इतक नव्हे, तर डेव्हिडविषयी अनेकांच्या मनात नकारात्मक विचारही आले.

लैंगिक शोषण प्रकरणात डेव्हिडचं नाव गोवलं गेलं असलं तरीही आपला या प्रकरणात आपला काहीच हात नसल्याचं म्हणत डेव्हिडने बऱ्य़ाचदा आपल्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. पुराव्यांअभावी आपल्यावर हे आरोप करण्यात येत असल्याचंही तो म्हणाला होता.

FIFA World Cup 2018 : …म्हणून स्पर्धेसाठी पात्र ठरूनही भारतीय संघ खेळला नाही १९५०चा वर्ल्डकप!

दरम्यान, रशियासाठी स्पेनचा फुटबॉल संघ रवाना होण्यापूर्वी पेड्रो यांनी संघाची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी डेव्हिडची माफी मागत हा वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला होता. त्याविषयी खुद्द डेव्हिडने माहिती दिली. ‘मी त्यांच्या माफीचा स्वीकार करतोय खरा. पण, यापूर्वी त्यांनी इतक्या लोकांसमोर जे वक्तव्य केलं होतं, ते पाहता आता त्यांनी माझी जाहीर माफीच मागावी’, अशीच मागणीही त्याने केली.

वाचा : FIFA World Cup 2018 : मच्चाsss… देवभूमी केरळात अशी पसरतीये फुटबॉलची जादू

‘आपल्यावर ते आरोप केल्यापासूनच मी पत्रकार परिषद घेऊन ते आरोप फेटाळले होते. पण तरीही सर्वसामान्यांमध्ये त्याविषयीच्या चर्चा सुरुच होत्या’, असं डेव्हिड स्थानिक वृत्तपत्राशी संवाद साधत म्हणाला. सरतेशेवटी सत्य सर्वांसमोर उघड झालं असल्याचं म्हणत त्याने याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली.

पेड्रो यांनी आपल्यावर जे आरोप केले होते, ज्यानंतर देशातील जनतेचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला होता. किंबहुना कित्येकांनी माझा अनादर केला, व्यक्तीगतपणे माझी माफी मागण्याची तसदीही कोणी घेतली नाही. असं म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली.