22 September 2019

News Flash

FIFA World Cup 2018 : शतकी सामन्यातील विजयानंतर सुआरेझने केली ‘ही’ खास घोषणा

FIFA World Cup 2018 : सुआरेझने आपल्या संघाला बाद फेरीचे तिकीट मिळवून दिलेच. पण त्याबरोबरच त्याने आनंद द्विगुणित करणारी एक घोषणा केली.

FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत बुधवारी उरुग्वेने सौदी अरेबियाला १-०ने पराभूत केले. सौदी अरेबियाचा स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव ठरला. पण उरुग्वेचा मात्र हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. सामन्यात उरुग्वेकडून लुई सुआरेझ याने एकमेव गोल केला. हा सामना सुआरेझसाठी खास होता.

लुई सुआरेझने आपला १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा विशेष सामना खेळणाऱ्या लुई सुआरेझने उरुग्वेला विजय मिळवून दिला. सुआरेझने सामन्याच्या २३व्या मिनिटाला गोल केला. कॉर्नरवरून सांचेझने किक केलेला बॉल सुआरेझने अतिशय सफाईदारपणे दिशा देत गोल पोस्टच्या दिशेने मारला आणि आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पूर्वार्धातच उरुग्वेने १-० अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र दोनही संघातील खेळाडूंना गोल करता आले नाही. त्यामुळे या सामन्यात केवळ १ गोल झाला. त्यामुळे सौदी अरेबियाला १-०ने पराभवाचा स्वीकार करावा लागला. सुआरेझ आपल्या १००व्या सामन्यात ‘विजयाचा शिल्पकार’ ठरला.

सुआरेझने आपल्या संघाला बाद फेरीचे तिकीट मिळवून दिलेच. पण त्याबरोबरच त्याने आंनद द्विगुणित करणारी एक घोषणा केली. त्याने ट्विटरवरून या गोड बातमीची घोषणा केली. ‘उरुग्वेतर्फे १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यामुळे मी मनापासून आनंदी झालो आहे. आजच्या विजयाने आम्हाला बाद फेरीत स्थान मिळाल्याचाही आनंद आहे. आणि त्यात दुघडशर्करा योग्य म्हणजे माझी पत्नी गरोदर असून आम्हाला लवकरच तिसरे अपत्य होणार आहे.

या पोस्टमध्ये त्याने सर्व हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

First Published on June 21, 2018 5:50 pm

Web Title: fifa world cup 2018 suarez announces wife is preganant