News Flash

FIFA World Cup 2018 SWE vs ENG : २८ वर्षांनंतर इंग्लंडने रचला ‘हा’ इतिहास

FIFA World Cup 2018 SWE vs ENG : सामन्यात इंग्लंडने स्वीडनला २-०ने मात दिली.

FIFA World Cup 2018 SWE vs ENG : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि स्वीडन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगला. या सामन्यात इंग्लंडने स्वीडनला २-०ने मात दिली. हा सामना जिंकून इंग्लंडने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ही कामगिरी करण्यासाठी इंग्लंडला तब्बल २८ वर्षे वाट पाहावी लागली. याआधी १९९० साली इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्यावेळी उपांत्य फेरीत वेस्ट जर्मनीकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

आजच्या सामन्यात मात्र इंग्लंडने जोरदार कामगिरी केली. सामन्याच्या पूर्वार्धात ३०व्या मिनिटाला हॅरी मॅग्वायरने गोल केला आणि इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. कारकिर्दीतील पहिलाच आंतरराष्ट्रीय गोल वर्ल्डकपमध्ये करण्याचा मान त्याने मिळवला. असे करणारा हॅरी मॅग्वायर हा १३वा खेळाडू ठरला. पूर्वाधात इंग्लंड १-०ने आघाडीवर राहिली.

उत्तरार्धात स्वीडनकडून आक्रमक सुरुवात झाली. पण त्यानंतरचा खेळ हा इंग्लंडच्या वर्चस्वाखाली गेला. इंग्लंडने आक्रमक पवित्रा कायम ठेवत हल्ले सुरूच ठेवले. त्याचा फायदा इंग्लंडला ५८व्या मिनिटाला मिळाला. सामन्यातील आणखी एका कॉर्नर किकवर इंग्लंडने दुसरा गोल केला. डेले अली याने हा गोल करत इंग्लंकडून गोल करणारा ५वा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला. त्यानंतर ही आघाडी कायम राखण्यात इंग्लंडला यश आले आणि त्यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2018 10:04 pm

Web Title: fifa world cup 2018 swe vs eng england enter semi final after 28 years
टॅग : England,Semi Final
Next Stories
1 FIFA World Cup 2018 SWE vs ENG : ‘डोकं लावून’ इंग्लंडची सेमीफायनलमध्ये धडक
2 FIFA World Cup 2018 : ब्राझीलचा तो गोल्डन टच हरवला तरी कुठे?
3 FIFA World Cup 2018 : ३२ वर्षांनी बेल्जियमने ‘हे’ करुन दाखवलं
Just Now!
X