14 November 2019

News Flash

FIFA World Cup 2018: इराणला बरोबरीत रोखत पोर्तुगाल बादफेरीत

रोनाल्डोलाही ५१ व्या मिनिटाला त्याला पेनल्टी किक मिळाली. पण इराणी गोलकिपर अलीरजाने आपल्या डाव्या बाजूला झेप घेत चेंडू अडवला.

फिफा विश्वचषकातील 'ब' गटातील पोर्तुगाल आणि इराण यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. पोर्तुगालने हाफ टाइमच्या काही क्षण आधी गोल केला. REUTERS/Ricardo Moraes

फिफा विश्वचषकातील ‘ब’ गटातील पोर्तुगाल आणि इराण यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला. पोर्तुगालने हाफ टाइमच्या काही क्षण आधी गोल केला. हा गोल रिकार्डोने केला. हा सामना बरोबरीत ठेऊन पोर्तुगाल बादफेरीत पोहोचला आहे. ते ‘ब’ गटात दुसऱ्या स्थानी राहिले. त्यांचा सामना आता ‘अ’ गटातील आघाडीचा संघ ऊरग्वेबरोबर होईल.