News Flash

FIFA World Cup 2018 TimeTable : सामने पाहण्यासाठी भारतीयांना जागरण करण्याची गरज नाही…

फुटबॉल म्हटले की बहुतांश सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा किंवा मध्यरात्री खेळले जातात.

कधी पाहता येतील भारतीय वेळेनुसार फुटबॉल वर्ल्डकपचे सामने?

FIFA World Cup 2018 ही स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जवळपास सर्व देशांचे संघ आता रशियामध्ये दाखल झाले आहेत. १४ जूनपासून ३२ संघ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. या स्पर्धेत हे ३२ संघ ८ गटांमध्ये विभागण्यात आले आहेत. यजमान रशियाला या गटात स्थान मिळाले असून याच गटात १४व्या स्थानी असलेला बलाढ्य उरुग्वेही आहे. तर रोनाल्डोचा पोर्तुगाल बी गटात असून याच गटात १०व्या स्थानी असलेल्या स्पेनचा समावेश आहे. क गट हा तुल्यबळ संघांचा असून यात ७व्या स्थानी असलेला फ्रान्स, ११व्या स्थानी असलेला पेरू, १२ व्या असलेला स्थानी डेन्मार्क अशी कडवी झुंज होणार आहे. द गटात अर्जेंटिना आणि क्रोएशिया हे तगडे प्रतिस्पर्धी आहेत. इ गटात ब्राझीलच्या संघाचा समावेश आहे. तर फ गटात जर्मनी आणि मेक्सिको हे संघ असणार आहेत. ग गटात ३ऱ्या स्थानी असलेल्या बेल्जीयमचे वर्चस्व राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर ह गटात ८ व्या स्थानी असलेल्या पोलंडचा समावेश आहे.

FIFA World Cup 2018 – गट

 

फुटबॉल म्हटले की बहुतांश सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा किंवा मध्यरात्री खेळले जातात. पण FIFA World Cup 2018 ही स्पर्धा रशियामध्ये होणार आहे. आणि भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी ही एक खुशखबर आहे. या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी भारतीयांना जागरण करण्याची गरज भासणार नाही. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात दुपारी ३.३० पासून सुरु होणार असून दिवसाचा शेवटचा सामना रात्री ११.३० वा. सुरु होणार आहे. त्यामुळे आपल्या झोपेच्या वेळा सांभाळूनही फुटबॉल चाहत्यांना सर्व सामने पाहता येणार आहेत.

 

स्पर्धेतील बाद फेरीचे सामने ३० जून ते ३ जुलै दरम्यान होणार आहेत, तर उपांत्यपूर्व फेरीचे सामने ६ व ७ जुलैला होणार आहेत. उपांत्य फेरी १० ते १४ जुलैला होणार असून अंतिम सामना १५ जुलैला होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:09 pm

Web Title: fifa world cup 2018 timetable indian standard time no need to sacrifice sleep
टॅग : Fifa,Football
Next Stories
1 FIFA World Cup 2018  : अभिनव ‘व्हिडिओ रेफरल’ तंत्रज्ञान निर्णायक
2 FIFA World Cup 2018 : विश्वचषकाची रणमैदाने : सेन्ट्रल स्टेडियम एकतेरिनबर्ग
3 FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषकात ‘रॉबी’चा स्वर
Just Now!
X