FIFA World Cup 2018 URU vs FRA : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली. या फेरीतील पहिल्या सामन्यात फ्रान्सने उरुग्वेवर २-० अशी मात केली. या विजयासह फ्रान्सने तब्बल १२ वर्षांनंतर उपांत्य फेरीत प्रवेश केला. संपूर्ण सामन्यात उरुग्वेकडून एकही गोल करता आला नाही. त्यामुळे उरुग्वेचा विश्वचषक स्पर्धेतील प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आला.
#FRA reach the semi-finals for the first time since 2006, and their sixth time in total #URUFRA // #WorldCup pic.twitter.com/KYhZW0E23J
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 6, 2018
फ्रान्स आणि उरुग्वे यांच्यातील सामना हा फ्रान्सचे आक्रमण विरुद्ध उरुग्वेचा बचाव या स्वरूपाचा होता. उरुग्वेविरुद्ध संपूर्ण स्पर्धेत या सामन्याआधी केवळ १ गोल मारण्यात आला होता. त्यामुळे मार्टिन केसेरेस, जोस मारिया गिमनेज, डीएगो गॉडीन आणि लक्झाल्ट या बचाव फळीची तटबंदी भेदणे हा फ्रान्सच्या आक्रमण फळीपुढचे आव्हान होते.
फ्रान्सने सुरुवातीपासूनच आक्रमण करण्यास सुरुवात केली. सामन्याच्या ३९व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत फ्रान्सच्या बचाव फळीतील वरानने ४०व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यामुळे पूर्वार्धात फ्रान्सचा संघ १-०ने आघाडीवर राहिला. त्यानंतर उत्तरार्धात ग्रीझमनने ६१व्या मिनिटाला गोल करून ही आघाडी वाढवली. सामना संपेपर्यंत ही आघाडी कायम राखण्यात फ्रान्सला यश आले.
आता ब्राझील आणि बेल्जीयम या संघापैकी विजेत्या संघाशी फ्रान्स उपांत्य फेरीत झुंज देणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 9:35 pm