03 April 2020

News Flash

FIFA World Cup 2018 URU vs RSA : शतकी सामन्यात सुआरेझचा विजयी गोल; उरुग्वेची सौदी अरेबियावर मात

FIFA World Cup 2018 URU vs RSA : फिफा विश्वचषक स्पर्धेत उरुग्वेने सौदी अरेबियाला १-० ने पराभूत केले.

FIFA World Cup 2018 URU vs RSA : फिफा विश्वचषक स्पर्धेत उरुग्वेने आज सौदी अरेबियाला १-०ने पराभूत केले. सौदी अरेबियाचा स्पर्धेतील हा सलग दुसरा पराभव ठरला आहे. आपला १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या लुई सुआरेझने उरुग्वेला विजय मिळवून दिला. सुआरेझने सामन्याच्या २३व्या मिनिटाला गोल केला. कॉर्नरवरून सांचेझने किक केलेला बॉल सुआरेझने अतिशय सफाईदारपणे दिशा देत गोल पोस्टच्या दिशेने मारला आणि आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पूर्वार्धातच उरुग्वेने १-० अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र दोनही संघातील खेळाडूंना गोल करता आले नाही. त्यामुळे या सामन्यात केवळ १ गोल झाला. त्यामुळे सौदी अरेबियाला १-०ने पराभवाचा स्वीकार करावा लागला.

उरुग्वे संघाला आपल्या प्रेक्षणीय खेळाने अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून देणाऱ्या लुई सुआरेझचा हा ऐतिहासिक सामना होता.कारकीर्दीतील १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज असलेल्या सुआरेझने उरुग्वेला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उप-उपांत्यपूर्व फेरी गाठून दिली. त्याच्या आक्रमणामुळे सौदी अरेबियासारखा तुलनेने कमकुवत संघ त्याला रोखू शकला नाही.

सुआरेझचा पराक्रम

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात उरुग्वेने इजिप्तला १-० असे पराभूत केले. मात्र सुआरेझला त्या सामन्यात इजिप्तच्या बचावपटूंनी चांगलेच जखडून ठेवले होते. त्यामुळे सौदी अरेबियाविरुद्ध त्या अपयशाची भरपाई करण्यासाठी तो उत्सुक होता. दरम्यान, या विजयाबरोबर उरुग्वेचा संघ आज बाद फेरीत (राउंड ऑफ १६) पोहोचला आहे. तर रशियाच्या संघानेही दोन विजय मिळवत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे या गटातून रशिया आणि उरुग्वे हे संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर या पराभवाबरोबर सौदी अरेबियाचा हा दुसरा पराभव ठरला असून स्पर्धेतील सौदी अरेबियाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

या पराभवाबरोबर सौदी अरेबियाचा हा दुसरा पराभव ठरला असून स्पर्धेतील सौदी अरेबियाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

या गोलबरोबर लुई सुआरेझने एक विक्रमही केला. सलग ३ विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा लुई सुआरेझ हा उरुग्वेचा पहिला खेळाडू ठरला. सुआरेझने २०१०, २०१४ आणि २०१८ अशा सलग तीनही फिफा विश्वचषकात गोल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 10:35 pm

Web Title: fifa world cup 2018 uru vs rsa uruguay won over saudi arabia 1 0
टॅग Saudi Arabia
Next Stories
1 FIFA World Cup 2018 ARG vs CRO : ‘मी कायम तुझ्यासोबतच’; मेसीसाठी पत्नीचा प्रेमळ संदेश
2 FIFA World Cup 2018 POR vs MOR : पोर्तुगालच्या विजयात रोनाल्डो चमकला; मोरोक्कोचे आव्हान जवळपास संपुष्टात
3 Fifa world Cup 2018 Video : स्पर्धेला गालबोट; लाईव्ह टीव्हीवर महिला रिपोर्टरची काढली छेड
Just Now!
X