10 April 2020

News Flash

FIFA World Cup Video : फुटबॉल संघाचा विजय क्रिकेट संघानेही केला साजरा

ज्या क्षणी इंग्लंडने हा सामना जिंकला, त्यावेळी इंग्लंड क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जोरदार विजयोत्सव साजरा करण्यात आला.

FIFA World Cup 2018 Video : इंग्लंड आणि कोलंबिया यांच्यातील बाद फेरीच्या सामन्यात इंग्लंडने पेन्लटी शूटआऊटमध्ये कोलंबियावर ४-३ने विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली. नियमित वेळेनंतर देण्यात येणाऱ्या अतिरिक्त वेळेतही १-१ अशी गोल बरोबरी कायम राहिल्यामुळे हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला होता. पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडने पहिल्या दोन संधीचे गोलमध्ये रुपांतर केले पण इंग्लंडच्या जॉर्डनची तिसरी पेनल्टी किक कोलंबियाचा गोलरक्षक डेव्हीड ओसपिनाने रोखली. त्यानंतर कोलंबियाच्या उरीबीने चौथी पेनल्टी वाया घालवली. त्यानंतर इंग्लंडकडून ट्रीपरने गोल करण्यात कोणतीही चूक केली नाही. कोलंबियाकडून कार्लोस बाक्काने पाचव्या पेनल्टीवर मारलेला चेंडू इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने अडवला. तिथेच इंग्लंडचे मनोबल उंचावले. त्यानंतर डायरने कोणतीही चूक न करता गोल केला आणि इंग्लंडने थरारक पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियावर ४-३ ने विजय मिळवला.

ज्या क्षणी इंग्लंडने हा सामना जिंकला. त्यावेळी सर्वत्र विजयोत्सव साजरा झाला. मैदानात इंग्लंकडच्या चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. पण हे सेलिब्रेशन इथेच न थांबता थेट क्रिकेटच्या ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचले. विजय मिळवल्याचा क्षणी इंग्लंड क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जोरदार विजयोत्सव साजरा करण्यात आला. सर्व क्रिकेटपटूनी नाचत आणि गात हा आनंद साजरा केला.

हा पहा व्हिडीओ –

हा व्हिडीओ इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर याने शेअर केला असून हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2018 2:27 pm

Web Title: fifa world cup 2018 video england cricket team celebrates football team victory
टॅग England
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : ‘तुझ्यापेक्षा कॅन्सर बरा’; कोलंबियाचे चाहते खेळाडूंवर खवळले
2 FIFA World Cup 2018 : आहे अनपेक्षित तरी..
3 FIFA World Cup 2018 : ‘टिकी-टाका’च्या निमित्ताने
Just Now!
X