News Flash

FIFA World Cup 2018 : फिफाच्या ब्रँड अॅम्बेसिडरविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

फिफाची अधिकृत ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवडली गेलेली व्हिक्टोरिया या विश्वचषकाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.

व्हिक्टोरिया, fifa, victoria

FIFA World Cup 2018. फुटबॉल हा एक असा खेळ आहे, ज्यावर सहसा पुरुषांचीच मक्तेदारी पाहायला मिळते. मुख्य म्हणजे आजही मुलींना फुटबॉल हा खेळ आवडतो असं म्हटल्यावर भुवया उंचावणारे काही मित्र आपल्याला भेटतात. पण, सध्या याच खेळाच्या निमित्ताने एक सौंदर्यवती प्रकाशझोतात आली असून, तिच्या सौंदर्यावर आणि फुटबॉलप्रती असणाऱ्या प्रेमावर सर्वजण भाळले आहेत. रशियात पार पडणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषकाचीच सध्या सर्वत्र हवा असून, यंदाच्या फिफाची ब्रँड अॅम्बेसिडर व्हिक्टोरिया लोपीरेवा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन यांच्या संमतीनंतरच व्हिक्टोरियाची फिफा २०१८च्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी निवड करण्यात आली.

कोण आहे व्हिक्टोरिया लोपीरेवा?
goal.com ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार व्हिक्टोरिया लोपीरेवाचा जन्म २८ जुलै १९८३ मध्ये रशियात झाला होता. ३४ वर्षीय व्हिक्टोरियाने तिच्या शालेय दिवसांमध्ये अभ्यासासोबतच संगीतकलेचंही शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तिने रोस्टोव्ह स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स येथून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली.

ऐन तारुण्यातच तिला मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. १९९९ मध्ये तिने ‘इमेज एलिट’सोबत आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. पण, त्यामुळे तिला फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर ‘मॉडेल ऑफ डॉन’, ‘फेस ऑफ द इयर’, ‘रोस्टोव्ह ब्युटी’ आणि ‘डॉनबास ओपन’ या स्पर्धांच्या विजेतेपदामुळे ती खऱ्या अर्थाने नावारुपास आली. २००३ मध्ये मिस रशियाच्या मुकुटावर आपलं नाव कोरण्यापूर्वी व्हिक्टोरियाने तिची वेगळी ओळख प्रस्थापित केली होती.

आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने बऱ्याच फॅशन आणि सेलिब्रिटी प्रकाशन संस्थांसोबत काम केलं आहे. ज्यामध्ये ‘कॉस्मोपॉलिटन’,’मॅक्झिम’, ‘गाला’ आणि लोफिशिअल या ब्रँडचा समावेश आहे. त्याशिवाय काही रशियन टेलिव्हिजनवर काही फॅशन शोचाही ती भाग होती.

अशा प्रकारे आली फुटबॉलच्या दुनियेत
२००७ मध्य ‘फुटबॉल नाइट’ या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा व्हिक्टोरियाच्या खांद्यांवर होती. ज्यानंतर तिला या खेळात रस वाटू लागला. याच खेळामुळे व्हिक्टोरियाच्या खासगी आयुष्यातही बऱ्याच घडामोडी झाल्या. २०१२ मध्ये ती रशियन फुटबॉल संघातील स्ट्राइकर फ्योदोर स्मोलोव्हला Fyodor Smolov भेटली. ज्यानंतर त्या दोघांनीही २०१३ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांचं हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. २०१५ मध्ये डिसेंबर महिन्याच्या सुमारास त्यांनी घटस्फोट घेतला.

वाचा : FIFA World Cup 2018 Couple Goals: ‘हे’ फुटबॉलप्रेमी दाम्पत्य दहावा वर्ल्डकप पाहण्यासाठी सज्ज, पण…

Victoria Lopyreva Victoria Lopyreva

फिफाच्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी व्हिक्टोरिया करणार ‘हे’ काम
फिफाची अधिकृत ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवडली गेलेली व्हिक्टोरिया या विश्वचषकाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. ज्याच्या माध्यमातून ती रशियन संस्कृतीचा प्रचार करणार आहे. त्याशिवाय ती या खेळाच्या आयोजनामागची काही महत्त्वाची उद्दिष्ट सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. यजमान देशातर्फे व्हिक्टोरिया यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपला सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सोशल मीडियावरही व्हिक्टोरिया बरीच सक्रिय असून, तिच्या फॉलोअर्सचा आकडाही अनेकांनाच थक्क करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 3:33 pm

Web Title: fifa world cup 2018 who is victoria lopyreva the world cup 2018 ambassador and model
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : हे आहेत विश्वचषक खेळणारे सर्वात छोटे देश
2 FIFA World Cup 2018 : विश्वविजेत्यांना कडवे आव्हान
3 FIFA World Cup 2018 : विश्वचषकाची रणमैदाने : निझ्नी नोव्होगोराड स्टेडियम
Just Now!
X