26 November 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : बारा वर्षानंतरही ‘तो’ चक्रव्यूह भेदण्यात ब्राझील अपयशी

फुटबॉलच्या विश्वात ब्राझील या नावाचा एक दबदबा आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाने पेले, रोनाल्डो आणि आता नेमार असे एकाहून एक सरस फुटबॉलपटू जगाला दिले.

फुटबॉलच्या विश्वात ब्राझील या नावाचा एक दबदबा आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाने पेले, रोनाल्डो आणि आता नेमार असे एकाहून एक सरस फुटबॉलपटू जगाला दिले. पण मागच्या काही वर्षात ब्राझीलला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००२ साली ब्राझीलने शेवटचा वर्ल्डकप जिंकला पण त्यानंतरच्या वर्ल्डकप स्पर्धांमध्ये ब्राझीलला आपला तो दबदबा, हुकूमत सिद्ध करता आलेली नाही.

प्रत्येक वर्ल्डकपमध्ये ब्राझीलच्या संघाची जोरदार चर्चा होते. हा संघ विजयासाठी सर्वांचा फेव्हरेट असतो पण उपांत्यपूर्व किंवा उपांत्यफेरीपुढे त्यांची गाडी जात नाही. मागच्या सलग चार विश्वचषक स्पर्धांच्या बादफेरीत युरोपियन देशांकडून पराभव झाल्यामुळे ब्राझीलचे आव्हान संपुष्टात आले आहे. एकेकाळी ब्राझीलची टीम युरोपियन देशांवर भारी पडायची. पण अलीकडे युरोपातल्या आघाडीच्या संघांसमोर ब्राझीलचा संघ हतबल ठरत असल्याचे दिसून आले आहे.

– २००६ सालच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात फ्रान्सने ब्राझीलचा १-० गोलने पराभव केला.

– २०१० सालच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात हॉलंडने ब्राझीलवर २-१ गोलने विजय मिळवला.

– २०१४ फुटबॉल वर्ल्डकपच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात जर्मनीने ब्राझीलचा ७-१ असा धुव्वा उडवला होता.

– २०१८ फुटबॉल वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्वफेरीत बेल्जियमने ब्राझीलवर २-१ असा विजय मिळवला.

प्रत्येक वर्ल्डकपमध्ये ब्राझीलला विजयासाठी सर्वाधिक पसंती दिली जाते. कारण या देशाचा फुटबॉल जगतातला लौकिक तसा आहे. आतापर्यंत पाचवेळा फुटबॉल वर्ल्डकप जिंकण्याची किमया या देशाने केली आहे. पण यापुढे ब्राझीलला ठोस काही तरी करुन दाखवावे लागले तरच त्यांचा फुटबॉल जगतातला दबदबा टिकून राहिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2018 2:49 am

Web Title: fifa world cup brazil lost against belgium
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : कठीण कठीण कठीण किती?
2 FIFA World Cup 2018 : इंग्लंडच्या चाहत्यांना हल्ल्यांचीच भीती
3 FIFA World Cup 2018 : इंग्लिश वि. स्वीडिश!
Just Now!
X